ठाणे येथील राज्ञी वूमन वेलफेअर असोसिएशन आणि व्यास क्रिएशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने “विश्वास गतिमंद मुलांचे केंद्र” या शाळेतील विद्यार्थ्यांसोबत पुस्तक हंडी साजरी केली. (Book Dahihandi) दहीहंडी म्हणजे हल्ली फक्त थरांवर थर ही संकल्पना मोडीत काढून समाजातील प्रत्येक स्तरापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे या उद्दिष्टाखाली राज्ञीच्या कार्यकारी संचालिका वैशाली गायकवाड यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा छोटासा उपक्रम आहे.
(हेही वाचा – I.N.D.I.A. Alliance : जागावाटप करताना इंडिया आघाडीला करावी लागणार तारेवरची कसरत)
वाचन संस्कृती टिकून राहावी; म्हणून राज्ञी वूमन वेलफेअर असोसिएशन आणि व्यास क्रिएशन्स विविध उपक्रम राबवत असतात. तसेच लहान मुले, महिला आणि वृद्ध यांच्या भावविश्वात अनेक कार्यक्रम आयोजित करीत असतात. वाचन संस्कृती समाजातल्या प्रत्येक घटकांमध्ये रुजावी, यासाठी हा उपक्रम गेली चार वर्ष व्यास क्रिएशन “विश्वास” या संस्थेसोबत करत आहे. (Book Dahihandi)
विश्वास संस्थेच्या ट्रस्टी ज्योत्स्ना प्रधान आणि मुख्याध्यापिका मीना क्षीरसागर यांनी विश्वास संस्थेतील मुलांच्या उद्योगशील वृत्तीला चालना देण्यासाठी संस्थेत विविधांगी उपक्रम कायम राबविले जात असल्याचे सांगितले. मुलांनी बनवलेले लोकरीचे रुमाल, फुल, डेकोरेटिव्ह पेन स्टँड, ऍक्रेलिक रांगोळ्या, भाजणी पीठ या सगळ्याच वस्तूंची खरेदी करून राज्ञी सभासदांनी मुलांच्या उद्योगशीलतेला प्रोत्साहन दिले.
मुलांना बाल साहित्य पुस्तकरूपी भेट
या प्रसंगी बोलताना राज्ञीच्या कार्यकारी संचालिका वैशाली गायकवाड यांनी सांगितले की, “आगामी काळात असे विविध सामाजिक बांधीलकी जपणारे उपक्रम राज्ञी वूमन वेलफेअर असोसिएशन तर्फे आयोजित केले जातील.”
या वेळी सर्व मुलांना भरपुर खाऊ आणि व्यासक्रिएशन्स् प्रकाशित बाल साहित्य पुस्तक रुपी भेट देण्यात आली. पुस्तकं पाहून आणि सर्वांना भेटून मुलांच्या चेहर्यावरील आनंद स्पष्ट दिसत होता. मुलांच्या उद्योगशीलतेला कायम प्रोत्साहन मिळावे आणि त्यांना त्याच्यातून एक समाधान मिळत राहावे म्हणून, असे उपक्रम कायम राबवण्याचे आवाहन विश्वास संस्थेच्या मुख्याध्यापिका मीनाताई क्षीरसागर यांनी केले. (Book Dahihandi)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community