राज्यातल्या अनेक जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढायला लागल्यापासून आरोग्य विभागासह प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. सरकारकडून सातत्याने काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. कोरोनाच्या दुस-या डोसनंतर बूस्टर डोस घेण्यासाठी 9 महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. परंतु आता 6 महिन्यांनी बूस्टर डोस देण्याचा निर्णय राष्ट्रीय लसीकरण तांत्रिक सल्लागार गटाने घेतला आहे.
मुंबईत रोज दोन हजारांच्या संख्येने कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने, आरोग्य विभागाने चिंता व्यक्त केली आहे. नागरिकांना काळजी घेण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. अनेक रुग्णालयांमध्ये कोरोनासाठी वेगळे बेड तयार करण्यात आले आहेत. विशेष खासगी रुग्णालयात 30 ते 40 रुग्ण उपचार घेत आहेत. तर सरकारी रुग्णालयात 516 रुग्णणांवरती उपचार सुरु आहेत.
( हेही वाचा: लष्कर भरतीसाठी अग्निपथ योजनेच्या किमान वयोमर्यादेत बदल; सरकारचा निर्णय )
मुलांचे लसीकरण वाढवणार
राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. पण सध्या नव्या व्हेरियंटचे रुग्ण सापडत नाहीत. कोरोना वाढत असला तरीही राज्यात निर्बंध नाही. तसेच शाळेवरही कुठलेही निर्बंध आणण्याचा अद्याप विचार नाही. तसेच शाळांमध्ये मुलांचे लसीकरण वाढवणार असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.