केंद्र सरकाराने परदेशात जाणाऱ्या नागरिकांसाठी बूस्टर डोसचा कालावधी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गट म्हणजेच NTAGI हे अंतर कमी करण्यासाठी शिफारस केली होती यानंतर हा निर्णय घेण्यात आला असून केवळ परदेशात जाणाऱ्या प्रवाशांसाठी बूस्टर डोसमध्ये सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
( हेही वाचा : १ जून पासून मुंबई पोलिसांचा मोफत ‘बेस्ट’ प्रवास बंद होणार )
९० दिवसात कोरोना बूस्टर डोस
NTAGI च्या शिफारशीनुसार आरोग्य मंत्रालयाने परदेश प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी दुसरा डोस आणि बूस्टर डोस यामधील अंतर ९ महिन्यांहून कमी करत ते ९० दिवसापर्यंत कमी करण्यात आल्याची घोषणा केली आहे. यामुळे परदेशात जाणारे लोक आता आवश्यकतेनुसार सक्तीच्या ९ महिन्यांच्या कालावधी आधी ९० दिवसात कोरोना बूस्टर डोस घेऊ शकतात.
Precaution doses of Covid vaccine for those traveling overseas can now be administered at less than 9 months to a minimum interval of 3 months (90 days) from the date of administration of the second dose: Union Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/DDvoEGifj2
— ANI (@ANI) May 13, 2022
चौथ्या लाटेचा धोका कायम
देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्यात गेल्या महिन्याच्या तुलनेत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून चौथ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका कायम आहे. या लाटेला उंबरठ्यावरच रोखायचे असेल आणि राज्यात पुन्हा निर्बंध नको असतील, तर नागरिकांनी स्वत:हून मास्क वापरणे, लस घेणे अपरिहार्य असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात रुग्णांमध्ये फ्ल्यू सदृष्य लक्षणे आढळल्यास त्यांची तत्काळ आरटीपीसीआर टेस्टींग करा, राज्यातील टेस्टिंगची संख्या तसेच लसीकरणाचा वेग वाढवा अशा सूचनाही दिल्या आहेत.
Join Our WhatsApp Community