कोरोना बूस्टरसाठी व्हा सज्ज! अशी करा नोंदणी

राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोमवार १० जानेवारीपासून बूस्टर मात्रा देण्यात येणार आहे. आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन कर्मचारी आणि ६० वर्षावरील सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना बूस्टर मात्रा देण्यात येणार आहे. तसेच या नागरिकांचे लसीचे दोन्ही डोस पूर्ण असणे आवश्यक आहे. संबंधित लाभार्त्यांनी आधी जी लस घेतली आहे (कोव्हिशिल्ड/कोव्हॅक्सिन) तीच लस बूस्टर मात्रा म्हणून दिली जाणार आहे.

बूस्टर मात्रा

दुसरी मात्रा घेतलेल्या तारखेपासून ९ महिने किंवा ३९ आठवड्यानंतर बूस्टर मात्रा घेता येणार आहे. ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने नोंदणी करता येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बूस्टर मात्रा घेणे आवश्यक आहे. १० एप्रिल २०२१ किंवा त्यापूर्वी दुसरी मात्रा घेतलेले लाभार्थी सोमवार १० जानेवारी २०२२ रोजी बूस्टर मात्रा घेण्यास पात्र असणार आहेत.

( हेही वाचा : काय सांगताय! आता रेल्वे स्टेशनवर आधार, पॅनकार्ड, तिकीटासह विमाही काढता येणार )

ओळखपत्र बंधनकारक

बूस्टर मात्रेसाठी ऑनलाइन नोंदणी कोविन अथवा आरोग्यसेतू अॅपवरुन करता येणार आहे. शासकीय आणि महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर पात्र नागरिकांना विनामूल्य प्रतिबंधात्मक मात्रा देण्यात येईल. तर, खासगी लसीकरण केंद्रात पूर्वी घोषित झालेल्या किमतीतच लस दिली जाईल.

आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनी नोकरीच्या ठिकाणचे ओळखपत्र तर, ६० वर्षावरील सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी डॉक्टरांचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. या पात्र लाभार्त्यांना खासगी केंद्रात लस घ्यायची असल्यास त्यांनी शासकीय केंद्रावर येऊन योग्य ती नोंदणी करणे आवश्यक आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here