बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२३ : भारतासमोर ऑस्ट्रेलियाचे आव्हान… तरच टीम इंडियाला मिळेल WTC फायनल खेळण्याची संधी

144

भारत आणि ऑस्ट्रेलिया या संघांमध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही ४ सामन्यांची कसोटी मालिका ९ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. भारतासमोर बलाढ्य आणि कसोटीमधील नंबर १ चा संघ ऑस्ट्रेलियाचे आव्हान असणार आहे.

( हेही वाचा : Zomato वर गाजराचा हलवा ३ हजार, तर गुलाबजाम चक्क ४०० रुपये; काय आहे हा अजब प्रकार? ट्विटरवर चर्चा )

उमेश यादव गेम चेंजर ठरणार का?

भारतीय क्रिकेट संघाला ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये संधी मिळेल की नाही याचे भविष्य ही मालिका निश्चित करणार आहे. ही मालिका जिंकणे भारताला आवश्यक आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीमध्ये भारताचा उमेश यादव गेम चेंजर ठरू शकतो. उमेशला नागपूरचा राजकुमार असेही म्हटले जाते. पाटा पिचवर विकेट घेण्यात त्याचा कोणीही हात धरू शकत नाही. उमेशच्या अनुभवाचा भारताला मोठ्या प्रमाणात फायदा होईल.

दिनेश कार्तिक नव्या भूमिकेत 

या कसोटी मालिकेत भारताचा फिनिशर दिनेश कार्तिकचे कसोटीत पदार्पण होणार आहे अशी माहिती त्याने स्वत: ट्वीट करत आपल्या चाहत्यांना दिली आहे. परंतु यंदा दिनेश कार्तिक मैदानावर खेळताना नाही तर कॉमेंट्री करताना आपल्याला दिसेल. याआधी दिनेशने वनडे, टी२० सामन्यांसाठी कॉमेंट्री केली आहे परंतु भारतात होणाऱ्या कसोटी सामन्याची कॉमेंट्री दिनेश कार्तिक पहिल्यांदाच करणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.