Borivali Reservoir : बोरीवली जलाशयाचेही होणार स्ट्रक्चरल ऑडीट; ‘या’ भागाच्या लोकांना बसणार पाण्याची झळ

बोरीवली जलाशय पूर्णपणे रिकामे करून हे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात येणार असल्याने या दरम्यान पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी, पाण्याचा पुरेसा साठा करुन ठेवावा, आणि पाण्याचा वापर जपून करावा.

428
Borivali Reservoir : बोरीवली जलाशयाचेही होणार स्ट्रक्चरल ऑडीट; 'या' भागाच्या लोकांना बसणार पाण्याची झळ
Borivali Reservoir : बोरीवली जलाशयाचेही होणार स्ट्रक्चरल ऑडीट; 'या' भागाच्या लोकांना बसणार पाण्याची झळ

मलबार हिल जलाशयापाठोपाठ (Malabar Hill Reservoir) आता महानगरपालिकेच्या बोरिवली (पूर्व) येथील संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्यातील बोरिवली टेकडी जलाशय क्रमांक ०२ ची स्ट्रक्चरल ऑडीट मंगळवारी होणार आहे. मंगळवारी ०९ जानेवारी २०२४ रोजी दुपारी १ ते रात्री ९ वाजेपर्यंत हे स्ट्रक्चरल ऑडीट (structural audit) होणार आहे. या कामादरम्यान, बोरिवली टेकडी जलाशय क्रमांक २ रिक्त करण्यात येणार आहे. त्यामुळे, कांदिवली ते दहिसर या विभागातील पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. (Borivali Reservoir)

बोरीवली जलाशय (Borivali Reservoir) पूर्णपणे रिकामे करून हे स्ट्रक्चरल ऑडीट (structural audit) करण्यात येणार असल्याने या दरम्यान पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी, पाण्याचा पुरेसा साठा करुन ठेवावा, आणि पाण्याचा वापर जपून करावा. त्यानंतर पुढील दोन दिवस पाणी गढूळ येण्याची शक्यता आहे, त्यामुळे गुरुवारपर्यंत नागरिकांनी पाणी गाळून व उकळून प्यावे असे आवाहन महापालिका जलअभियंता विभागाने केले आहे. (Borivali Reservoir)

मंगळवारी या भागांना होईल कमी दाबाने पाणी पुरवठा
कांदिवली विभाग

महिंद्रा आणि महिंद्रा, गुंदेचा ठाकूर गांव व समता नगर-सरोवा संकुल, कांदिवली (पूर्व). (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ६.२५ ते रात्री ८.२५) (Borivali Reservoir)

बोरीवली विभाग 

ला-बेल्लेजा व ला-वेस्टा, बोरिवली (पूर्व). (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ५.३० ते सायंकाळी ७.३०) (Borivali Reservoir)

(हेही वाचा – 100th Natya Sammelan : नवीन नाटकांमध्ये आजचे सामजिक बदल प्रतिबिंबित झाले पाहिजे; परिसंवादात मान्यवरांचा सूर)

दहिसर विभाग

शिव वल्लभ मार्ग (उत्तर बाजू), मारुती नगर, रावळपाडा, एन. जी. उद्यान, रिव्हर उद्यान, गावडे नगर, भोईर नगर, मिनी नगर, एस. एन. दुबे मार्ग, संत कबीर मार्ग, ज्ञानेश्वर नगर, कोकणीपाडा, संत नामदेव मार्ग, वाघदेवी नगर, केशव नगर, राधाकृष्ण नगर, धारखाडी, सुहासिनी पावसकर मार्ग, मेंदोडा कुंपण, भोईर कुंपण, सिद्धनाथ मिश्रा कुंपण, संत मीराबाई मार्ग, राज नगर, सुयोग नगर, वैशाली नगर, नरेंद्र संकुल, केतकीपाडा (अंशत:), एकता नगर, दहिसर टेलिफोन एक्स्चेंज, घरटनपाडा क्रमांक १ व २, गणेश मंदीर मार्ग, अष्टविनायक चाळ, दहिसर (पूर्व). (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ सायंकाळी ४.४० ते सायंकाळी ७.४०) (Borivali Reservoir)

आनंद नगर, आशीष संकुल, एन. एल. संकुल, वीर संभाजी नगर, भाबलीपाडा, पराग नगर, लिंक मार्ग, गोवण मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज संकुल, सुधींद्र नगर, देवयानी संकुल, महालक्ष्मी आणि सरस्वती संकुल, शक्ति नगर, सद्गुरू छाया लेऊट बंगाली पाडा, महाकाली वाडी, मातृछाया गल्ली, दहिसर भूयारी मार्ग, आनंद नगर (अंशत:), तरे कुंपण, अवधूत नगर, वर्धमान औद्योगिक परिसर, सी. एस. मार्ग, दहिसर पोलिस स्थानक परिसर, किसान नगर, वर्धमान औद्यगिक परिसर, डायमंड इंडस्ट्री, नॅशनल मील कुंपण, रामाणी कुंपण, केतकीपाडा ऑनलाईन पंपिंग, दहिसर (पूर्व). (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ रात्री ८.४५ ते रात्री ११.३०) (Borivali Reservoir)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.