बोरीवली पश्चिम येथील स्कायवॉकवरील प्रत्येक जिन्यांच्या पायऱ्यांवरील लाद्या उखडल्या गेल्यामुळे चालताना पादचारी पडून दुर्घटना होण्याची भीती वर्तवली असतानाही पूल विभागाकडून कोणत्याही प्रकारच्या हालचाली सुरु झालेल्या नाहीत. विशेष म्हणजे जानेवारी २०२४ बोरीवली भागातील या स्कायवॉकसह पादचारी पुलांच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी कंत्राटदाराची नेमणूक केली आहे. बोरीवलीतील या स्कायवॉकच्या दुरुस्तीसाठी कंत्राटदार नियुक्त असूनही त्यांच्याकडून महापालिकेचे पूल विभाग काम करून घेत नाही. त्यामुळे पूल विभागाने सांगूनही जर कंत्राटदार काम करत नसेल तर त्यांच्या विरोधात कारवाई करणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Borivali Skywalk)
मुंबईतील उड्डाणपूल, नाल्यावरील पूल, वाहनांकरता भुयारी मार्ग, आकाशमार्गिका, पादचारी पूल, तसेच पश्चिम व पूर्व द्रुतगती महामार्गावरील उड्डाणपूल एमएमआरडीएकडून महापालिकेच्या ताब्यात आली असून त्यानुसार या पुलांचे सर्वेक्षण केले जात आहे. तांत्रिक सल्लागारांच्या सर्वेक्षणानुसार बोरीवली विभागातील सुमारे २० पुलांची किरकोळ दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येत आहे. या सर्वेक्षणानुसार महापालिकेने नेमलेल्या एससीजी कन्सल्टन्सी या तांत्रिक सल्लागाराच्या सर्वेक्षणानुसार बोरीवलीतील स्कायवॉक (Borivali Skywalk) आणि पादचारी पूल आदींसह एकूण २० पुलांची डागडुजी करण्याचा निर्णय घेतला. या पुलांच्या किरकोळ दुरुस्तीसाठी विविध करांसह सुमारे १३ कोटी रुपये खर्च करण्यास मान्यता दिली होती. या पुलांच्या दुरुस्तीसाठी योगेश कंस्ट्रक्शन कंपनीची निवड करण्यात आली आहे. (Borivali Skywalk)
(हेही वाचा – Uttar Pradesh मध्ये 25 एकर जमीन अतिक्रमणमुक्त, मशिदीसह 1800 बेकायदा बांधकामे जमीनदोस्त)
बोरीवलीतील २० पुलांच्या डागडुजीसाठी कंत्राटदार
बोरीवली पश्चिम स्कायवॉक, फॅक्ट्री लेन अर्थात डी जी पालकर, पावनधाम मंदिर, दौलत नगर सिमेंट्री, गोराई पंपिंग, इंद्रायणी नाला (सुमित इमारत), शिवसृष्टी, एकसर नाला मेट्रो जवळ, एकसर नाला दर्गा जवळ, साईबाबा नगर, बोरीवली (पीएस) एसव्ही रोड, बोरभट पाडा, एकसर रोड कब्रस्तान, गोराई नाला, मुलजी नगर, सावरकर गेट क्रमांक ३, कस्तुर पार्क, आनंदीबाई काळे, म्हाडा कॉलनी चिकुवाडी, सुयोग इमारत आदी पादचारी पुलांसह २० पुलांची किरकोळ दुरुस्ती करण्यासाठी या कंत्राटदाराची निवड केली. त्यामुळे बोरीवली स्कायवॉकच्या जिन्यांवरील पायऱ्या उखडल्या गेल्याने त्यांची दुरुस्ती करणे शक्य असूनही त्यांच्याकडून करून घेतले जात नाही. त्यामुळे कंत्राटदार नियुक्ती असूनही या पायऱ्यांवरील उखडलेल्या लाद्यांची डागडुजी करणे शक्य असूनही प्रशासनाला संबंधित कंत्राटदाराकडून हे काम करून घेण्यात अपयश येत आहे. (Borivali Skywalk)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community