Borivali Skywalk : बोरिवलीतील स्कायवॉक पादचाऱ्यांसाठी की फेरीवाल्यांसाठी?

35
Borivali Skywalk : बोरिवलीतील स्कायवॉक पादचाऱ्यांसाठी की फेरीवाल्यांसाठी?
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

बोरीवली पश्चिम येथील फेरीवाल्यांविरोधात कारवाई केली जात असली तरी प्रत्यक्षात फेरीवाल्यांनी आता स्कायवॉकचा आधार घेण्यास सुरुवात केली आहे. रेल्वे स्थानकाशेजारी एस. व्ही. रोडवर कारवाई होत असल्याने आता फेरीवाल्यांनी स्कायवॉकवर व्यवसाय थाटण्यास सुरुवात केले. त्यामुळे आता नागरिकांना स्कायवॉकवरूनही चालण्यास मार्ग मोकळा मिळत नाही. बोरिवलीचे स्कायवॉक हे पादचाऱ्यांसाठी बांधले आहे की फेरीवाल्यांसाठी असा सवाल आता बोरिवलीकरांकडून उपस्थित केला जात आहे. (Borivali Skywalk)

मुंबई आयुक्त भूषण गगराणी यांनी मुंबईतील सर्व पदपथ अतिक्रमण मुक्त करून रेल्वे स्थानकांचे परिसर फेरीवालामुक्त करण्याचे निर्देश दिल्यानंतर परिमंडळाच्या उपायुक्त भाग्यश्री कापसे यांच्या देखरेखीखाली महापालिकेच्या आर मध्य विभागाच्या सहायक आयुक्त संध्या नांदेडकर यांनी नेतृत्वाखाली एस. व्ही. रोडवरील परिसरात ना फेरीवाला झोनचे फलक लावून सर्व फेरीवाल्यांना व्यावसाय करण्यास मज्जाव केला होता. त्यानंतर येथील कारवाई निरंतर सुरु असली तरी महापालिकेच्या अधिकाऱ्यांची पाठ फिरताच पुन्हा येथील रस्त्यावर फेरीवाल्यांकडून चोरीछुपे व्यवसाय केला जात आहे. (Borivali Skywalk)

(हेही वाचा – Delhi मध्ये वाढते रोहिंग्यांची संख्या; सुरक्षेसाठी बनलाय धोका; विधानसभा निवडणुकीत गाजणार मुद्दा)

विशेष म्हणजे बोरीवली पश्चिम येथील एस. व्ही. रोडवरील महापालिका मंडई, गोयल शॉपिंग सेंटरपासून ते ठक्कर मॉल, मोक्ष मॉलपर्यंतच्या पदपथावर मोठ्याप्रमाणात फेरीवाले व्यवसाय करत आहेत. ठक्कर मॉल ते मोक्ष मॉल पर्यंतच्या पदपथांचा वापर आपले सामान ठेवण्यासाठी रस्त्यावर धंदा थाटण्याचा प्रयत्न फेरीवाल्यांकडून केला जात असल्याने एस. व्ही. रोडवरील स्थानक परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होते. विशेष म्हणजे वाहनांना आणि पादचाऱ्यांना चालण्यास जागा नसल्याने बऱ्याचदा अपघात होण्याचे संभावना निर्माण होत होती. त्यामुळे महापालिकेच्या या कारवाईमुळे बोरिवलीकर खुश झाले असून तत्कालिन स्थानिक आमदार सुनील राणे यांनीही जाहीरपणे बॅनर लावून या कारवाईचे समर्थन करत महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले होते. (Borivali Skywalk)

परंतु आता पुन्हा एकदा महापालिकेने रेल्वे स्थानकाच्या परिसरांसह प्रमुख २० ठिकाणांवरील कारवाई तीव्र केल्यामुळे ही कारवाई कडक केली जात असताना बोरीवली पश्चिम येथील स्कायवॉकवर तसेच आतील मोकळ्या जागांवर या फेरीवाल्यांनी ठाण मांडल्याचे दिसून येत आहे. महापालिकेच्यावतीने होणाऱ्या कारवाईपासून वाचण्यासाठी स्कायवॉकचा आधार घेतला जात आहे. मात्र, या स्कायवॉकवर महापालिकेच्यावतीने कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्याने दिवसेंदिवस यावरील फेरीवाल्यांची संख्या वाढताना दिसत आहे. (Borivali Skywalk)

(हेही वाचा – काँग्रेसच्या तोंडाला संविधान बदलण्याचे रक्त असे लागले की…; PM Narendra Modi यांचा हल्लाबोल)

बोरीवली भागातील नवनिर्वाचित भाजपाचे आमदार संजय उपाध्याय यांनीही आता फेरीवाल्यांविरोधात कडक पावित्रा स्वीकारला आहे. बोरीवली स्थानकासमोर फेरीवाल्यांनी मोठ्याप्रमाणात अतिक्रमण केले आहे. त्यांच्यावर महापालिका व पोलिस कारवाई करत नाही. हे फार मोठे रॅकेट आहे. पण मी कितीही दबाव आला तरी ऐकणार नसून प्रचारादरम्यान माझ्या भगिनींनी फेरीवालामुक्त बोरिवली हवी अशी मागणी केली होती, ती मागणी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. प्रयंगी नागरिकांना एकत्र येवून माझे कार्यालय रस्त्यावर थोटेन. फेरीवाला, अतिक्रमण मुक्त याच कामाला माझे प्राधान्य असेल असेही संजय उपाध्याय यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले. (Borivali Skywalk)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.