Borivali-Thane Subway : आदिवासी तथा वननिवासींची नाही हरकत ना दावे

161
Borivali-Thane Subway : आदिवासी तथा वननिवासींची नाही हरकत ना दावे

बोरीवली ते ठाणे या चार पदरी भुयारी मार्गाच्या बांधकामामध्ये आदिवासी तसेच पारंपारिक वननिवासी यांची कोणतीही हरकत नसून महापालिकेच्या आर मध्य विभागाच्यावतीने वनहक्क कायदा अंतर्गत जाहीर सूचना मागवून हरकती व सूचना जाणून घेण्यात चा प्रयत्न केला. परंतु पंधरा दिवसांच्या कालावधी मागवलेल्या कोणतेही दावे किंवा कोणतीही हरकत प्राप्त झालेली नाही. त्यामुळे या वन जमिनीवरुन जाणाऱ्या भुयारी मार्गाच्या कामाचा मार्ग सुकर झाला आहे. (Borivali-Thane Subway)

मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांना जोडून वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्वाकांक्षी प्रकल्प एमएमआरडीएने हाती घेतला असून त्यानुसार संजय गांधी राष्ट्रीय उद्यान भूमिगत मार्गाच्या सहाय्याने बोरीवली ते ठाणे यांना जोडणारा मार्ग बनवला जात आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणारा हा प्रकल्प असून पूर्व पश्चिम लिंक रोड तयार होऊन राष्ट्रीय महामार्ग ३.८ मधील अवजड वाहतुकीसाठी कॉरिडॉर कार्यरत राहील. ठाणे ते बोरीवली दरम्यान घोडबंदर मार्ग २३ किमी अंतराच्या प्रवासासाठी सकाळी व संध्याकाळी वर्दळीच्या वेळी एक ते दोन तास आणि इतर वेळी किमान एक तास लागतो. त्यामुळे सुमारे १२ किमी लांबीच्या प्रकल्पातील ४.४३ किमी लांबी ही ठाणे जिल्ह्यातून तर ७.४ किमी लांबी ही बोरीवलीमधून प्रस्तावित आहे. बोगद्यांमध्ये नैसर्गिक किंवा यांत्रिकी मार्गाने पुरेशी वायुविजन प्रणाली उभारली जाणार आहे. (Borivali-Thane Subway)

(हेही वाचा – Election Duty : निवडणुकीच्या कर्तव्यावर असताना मृत्यू झाल्यास महापालिका कर्मचाऱ्यांच्या वारसांना १५ लाख रुपये)

एमएमआरडीएने हाती घेतलेल्या या प्रकल्पाचा भुयारी मार्ग हा वनजमीनीच्या पट्ट्यातून जात असल्याने उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी वन संवर्धन अधिनियम १९८० व अनुसुचित जनजाती व इतर परंपरागत वनधारक अधिनियम २००६ अंतर्गत एफआरए प्रमाणपत्र आणि वन (संवर्धन) अधिनियमांतर्गत या वन क्षेत्राचे कमीत कमी व टाळता न येणारे क्षेत्र असल्याबाबबत प्रमाणपत्राची मागणी केली आहे. त्यामुळे या वनजमिनीच्या क्षेत्रावर अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी यांचे वन क्षेत्रावर आदिवासी व इतर परंपरागत व निवासी वनहक्क कायदा २००६ अन्वये कोणतेही दावे आहेत अथवा नाही याची पडताळणी करण्यासाठी महापालिकेच्या आर-मध्य विभाग कार्यालयाच्या वतीने २८ मार्च २०२४ रोजी प्रत्यक्ष स्थळी जाहीर सुचना प्रसारित केली होती. या सूचनेनुसार १५ दिवसांच्या मुदतीत वन हक्क असल्याबाबतची माहिती महापालिकेच्या कार्यालयात कळवण्याचे आवाहन करण्यात आले होते. (Borivali-Thane Subway)

परंतु, त्यानंतर पुढील १५ दिवसांमध्ये कोणतेही दावे किंवा कोणतीही हरकत या प्राप्त झाली नसून त्यामुळे बोरीवलीतील हे क्षेत्र वन दावे नसल्याचे सिध्द झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांना ना हरकत प्रमाणपत्रे देण्यास प्रशासकांनी मंजुरी दिली आहे. (Borivali-Thane Subway)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.