Hawkers Action : फेरीवाल्यांवरील महापालिकेच्या कारवाईमुळे बोरीवलीकर खुश, मानले आमदारांचेच धन्यवाद

3601
Hawkers Action : फेरीवाल्यांवरील महापालिकेच्या कारवाईमुळे बोरीवलीकर खुश, मानले आमदारांचेच धन्यवाद

मुंबई महापालिकेच्यावतीने सध्या सुरु असलेल्या फेरीवाल्यांविरोधातील कारवाईमुळे मुंबईकरांमध्ये खुशीचे वातावरण असून ज्या रेल्वे स्थानकाच्या परिसरात अडथळ्याची शर्यत पार करावी लागत होती, तिथे आता प्रवाशांना विना अडथळा चालता येत आहे. विशेष म्हणजे या कारवाईमुळे बोरीवली पश्चिम येथील स्थानिकांकडून प्रचंड आनंद व्यक्त केला जात आहे. येथील एस व्ही रोडवरील मोक्ष मॉल ते गोयल शॉपिंग सेंटरसह महापालिका मंडईपर्यंतच्या फेरीवाल्यांवर महापालिकेने कारवाई करून हा परिसर फेरीवालामुक्त केल्याने एकप्रकारे नागरिकांकडून शुभेच्छांचे फलक लावले गेले आहे. मात्र, महापालिकेच्या कारवाईनंतरही काही भाडोत्री फेरीवाले गाडी पुढे निघून जाताच पुन्हा व्यवसाय करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे महापालिकेच्यावतीने अशा फेरीवाल्यांवर कडक करवाई करण्याची मागणी रहिवाशांकडून केली जात आहे. (Hawkers Action)

(हेही वाचा – एक वर्षात पीएम किसान योजनेत २० लाख ५० हजार लाभार्थींची वाढ; Dhananjay Munde यांचा दावा)

New Project 2024 07 02T200331.122

महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी मुंबईतील सर्व पदपथ अतिक्रमण मुक्त करून रेल्वे स्थानकांचे परिसर फेरीवालामुक्त करण्याचे निर्देश दिल्यानंतर परिमंडळाच्या उपायुक्त भाग्यश्री कापसे यांच्या देखरेखीखाली महापालिकेच्या आर मध्य विभागाच्या सहायक आयुक्त संध्या नांदेडकर यांनी नेतृत्वाखाली एस व्ही रोडवरील परिसरात ना फेरीवाला झोनचे फलक लावून सर्व फेरीवाल्यांना व्यावसाय करण्यास मज्जाव केला होता. त्यानंतर मागील शुक्रवारपासून या रस्त्यावरील कारवाई अधिक तीव्र करून एकही फेरीवाला बसणार नाही अशाप्रकारची मोहिम बोरीवली पश्चिमचा परिसर फेरीवालामुक्त करण्याचा प्रयत्न केला. (Hawkers Action)

विशेष म्हणजे बोरीवली पश्चिम येथील एस व्ही रोडवरील महापालिका मंडई, गोयल शॉपिंग सेंटरपासून ते ठक्कर मॉल, मोक्ष मॉलपर्यंतच्या पदपथावर मोठ्याप्रमाणात फेरीवाले व्यवसाय करत आहेत. ठक्कर मॉल ते मोक्ष मॉल पर्यंतच्या पदपथांचा वापर आपले सामान ठेवण्यासाठी रस्त्यावर धंदा थाटण्याचा प्रयत्न फेरीवाल्यांकडून केला जात असल्याने एस व्ही रोडवरील स्थानक परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होते. विशेष म्हणजे वाहनांना आणि पादचाऱ्यांना चालण्यास जागा नसल्याने बऱ्याचदा अपघात होण्याचे संभावना निर्माण होत होती. (Hawkers Action)

New Project 2024 07 02T200419.761

(हेही वाचा – Assembly session 2024: मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणार! वाचा एका क्लिकवर मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?)

या रस्त्याचा ताबा फेरीवाल्यांकडून घेतला गेल्याने तसेच पदपथासह अर्धा रस्ता फेरीवाल्यांकडून व्यापून टाकला जात असल्याने स्थानिक रहिवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. परंतु मागील शुक्रवारपासून या फेरीवाल्यांवर करवाई करून हा परिसर फेरीवालामुक्त केल्याने स्थानिक रहिवाशी तसेच मॉल आणि इतर दुकानांच्यावतीने धन्यवाद देणारे फलक लावण्यात आले आहे. बोरीवलीचे आमदार सुनील राणे यांचे छायाचित्र असलेले फलक लावण्यात आले असून ‘बोरीवली स्टेशन परिसर मे बैठनेवाले अनधिकृत फेरीवालों को सतत महापालिका और महाराष्ट्र सरकार कें संपर्क में रहकर और पत्र व्यवहार करके अनधिकृत फेरीवाला कों हटाने के लिये आमदार सुनील राणेजी आपका लाख लाख धन्यवाद’ अशा आशयाचे हे फलक आहे. (Hawkers Action)

New Project 2024 07 02T200602.393

महापालिकेच्यावतीने ही कारवाई कडक केली जात असली तरी महापालिकेचे पथक पुढे निघून गेल्यानंतर या भागातील काही भाडोत्री फेरीवाले हे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना न जुमानता पुन्हा व्यवसाय ठरण्याचा प्रयत्न चोरी छुपे करताना दिसत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या कारवाईची या फेरीवाल्यांमध्ये भीतीच राहिलेली नसून अशा फेरीवाल्यांना पकडून कडक कारवाई केली जावी अशाप्रकारची मागणीही स्थानिकांकडून केली जात आहे. (Hawkers Action)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.