ऑफिस,कॉलेज किंवा इतर ठिकाणी अनेकदा एकमेकांच्या देहयष्टीवरुन चिडवलं जातं किंवा वेगवेगळे सल्ले दिले जातात. पण ही गोष्ट आता ऑफिसच्या बॉसला चांगलीच भोवली आहे. ऑफिसमधील महिला कर्मचारीला जाड संबोधणं आणि जिमला जायचा सल्ला देणं बॉसच्या चांगलंच अंगलट आले असून यामुळे त्याला 18 लाखांचा भुर्दंड भरावा लागला आहे.
18 लाखांचा दंड
ऑफिसचा बॉस एका महिला कर्मचारीला जाड संबोधत असे आणि तिला सारखा जिमल जॉइन करण्याचा सल्ला देत असे. त्यामुळे सततच्या या अपमानकारक वागणुकीला कंटाळून संबंधित महिलेने बॉसला थेट न्यायालयात खेचले. न्यायालयात न्यायाधीशांनी यावरुन बॉसला खडे बोल सुनावले. तसेच त्याला 18 लाख रुपयांचा दंड देखील ठोठावला. स्कॉटलंड येथे हा प्रकार घडला आहे.
बॉसने केले आक्षेपार्ह मेसेज
बॉसने दिलेल्या अपमानकारक वागणुकीबाबत आवाज उठवणा-या या 35 वर्षीय महिला कर्मचारीचं नाव आयशा जमानी असं आहे. स्कॉटलंडच्या ग्लासगो येथील रहिवाशी असलेल्या जमानी यांनी त्यांचा बॉस शहजाद युनूस याच्याविरोधात ही तक्रार केली होती. बॉस त्यांना जाड म्हणत असे, तसेच काही नावांनी त्यांना संबोधत असे. तसेच बॉसने जमानी यांना काही आक्षेपार्ह मेसेज देखील पाठवले होते.
तू जाड आणि कुरुप आहेस ऑफिसमध्ये मला स्लिम आणि सुंदर मुलींचीच गरज आहे, असा दावा दमानी यांनी आपल्या तक्रारीत केला होता. याबाबत न्यायालयाने शहजाद युनूस याला 18 लाख रुपयांचा दंड ठोठावला.
Join Our WhatsApp Community