BPL Ration Card : राज्यात गरिबांची संख्या घटली

104
BPL Ration Card : राज्यात गरिबांची संख्या घटली
  • सुजित महामुलकर

गेल्या दोन वर्षात राज्यातील गरीबी काही प्रमाणात कमी झाली असल्याचे २०२३-२४ च्या महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवालाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. (BPL Ration Card)

राज्यात गेल्या दोन वर्षात शिधापत्रिकाधारकांची (Ration Cardholder) एकूण संख्या सहा लाखांपेक्षा अधिकने वाढली असली तरी दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाची संख्या जवळपास पावणेदोन लाखाने कमी झाली असल्याचे या आर्थिक पाहणी अहवालात म्हटले आहे. (BPL Ration Card)

ही आकडेवारी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने संकलित केल्याचे अहवालात म्हटले आहे. (BPL Ration Card)

BPL कुटुंबे ३८.५५ लाख

डिसेंबर २०२१ च्या आकडेवारीनुसार राज्यात शिधापत्रिकाधारकांची एकूण संख्या २.५६ कोटी तर दारिद्र्य रेषेखालील (BPL) पिवळ्या शिधापत्रिकाधारक कुटुंबाची संख्या ३८.५५ लाख होती. त्याचवेळी पांढऱ्या शिधापत्रिकाधारकांची संख्या २२.४२ लाख इतकी होती. पिवळ्या शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात धान्य पुरवठा केला जातो तर पांढऱ्या शिधापत्रिकाधारकांना यासाठी कोणतीही सवलत दिली जात नाही. (BPL Ration Card)

पावणेदोन लाखाने कमी

गुरुवारी २७ जून २०२४ ला सुरू झालेल्या राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ‘२०२३-२४ चा आर्थिक पाहणी अहवाल’ सादर करण्यात आला. त्यानुसार, फेब्रुवारी २०२४ पर्यंतची आकडेवारी संकलित करण्यात आली असून एकूण शिधापत्रिकाधारकांची संख्या २०२२ आणि २०२३ या दोन वर्षात २.६२ कोटीवर गेली. तर दारिद्र्य रेषेखालील पिवळी शिधापत्रिकाधारक कुटुंबे कमी होऊन ३६.७१ लाखांवर आली आहेत आणि पांढऱ्या शिधापत्रिकाधारकांची संख्या जवळपास ९,००० ने कमी होऊन २२.५२ लाखापर्यंत पोहोचली आहे. (BPL Ration Card)

(हेही वाचा – आणीबाणी देशाच्या लोकशाहीवर हल्लाच होता; President Droupadi Murmu यांचे संसदेच्या संयुक्त बैठकीत वक्तव्य)

गैरव्यवहार टाळण्यासाठी तिहेरी पत्रिका

सर्वसाधारणत: सधन कुटुंबातील व्यक्ती शिधावाटप दुकानामधील धान्य घेत नाहीत. त्यामुळे जी कुटुंबे धान्य घेतच नाहीत त्यांना शिधापत्रिकेवरुन धान्य देणे बंद केल्यास गैरव्यवहार कमी होतील व जास्त गरजू कुटुंबांना शिधापत्रिकेवर धान्य उपलब्ध करुन देता येईल. याचा सांगोपांग विचार करुन राज्यामध्ये दिनांक ५ मे, १९९९ पासून तिहेरी कार्ड योजना लागू करण्यात आली आहे. (BPL Ration Card)

वार्षिक उत्पन्नाची अट

त्यानुसार ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रू.१५,००० किंवा त्यापेक्षा कमी असेल ते कुटुंब पिवळ्या शिधापत्रिकेसाठी पात्र असतात तर केशरी कार्डसाठी एकत्रित वार्षिक उत्पन्न रुपये १५,००० पेक्षा जास्त परंतु १ लाख किंवा एक लाखांहून जास्त नसावे, अशी अट आहे. ज्या कुटुंबातील सर्व व्यक्तींचे मिळून एकत्रित वार्षिक उत्पन्न १ लक्ष किंवा त्यापेक्षा जास्त असेल असे कुटुंब पांढऱ्या शिधापत्रिकेस पात्र ठरतात. (BPL Ration Card)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.