भारतीय नौदलाने बंगालच्या उपसागरातून ब्रह्मोस (Brahmos Missile) या भारतातील सर्वात घातक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी बुधवारी, (१ नोव्हेंबर) केली. नौदलाकडून ब्राह्मोस क्षेणपणास्राचे छायाचित्रही प्रसिद्ध करण्यात आले आहे. ब्राह्मोसचा लष्कराच्या तीन रेजिमेंटमध्ये समावेश झाल्यामुळे जमीन, पाणी आणि आकाश या तिन्ही ठिकाणी शत्रू पराभूत होऊ शकतो.
ब्रह्मोसने भूदल, वायूदल आणि नौदल या तिन्ही दलाची चाचणी यशस्वी केली. त्यामुळे जमीन, पाणी आणि आकाश या ठिकाणांवरून शत्रू पळू शकत नाही, अशी माहिती नौदलाकडून देण्यात आली आहे. रशियाच्या मदतीने विकसित करण्यात आलेल्या या क्षेपणास्त्राची प्रगत आवृत्ती आता लष्कर, हवाई दल आणि नौदल या तिन्ही दलांकडून वापरली जात आहे.
(हेही वाचा – Maratha Reservation : आता जरांगे पाटलांचे देवेंद्र फडणवीसांना आव्हान; म्हणाले…)
प्रगत ब्राह्मोस
सुरुवातीला ब्रह्मोस जमिनीवरून हवेत हल्ला करण्यासाठी विकसित करण्यात आले. यशस्वी चाचणीनंतर लडाखमधील LAC ब्रह्मोस तैनात करण्यात आले. त्यानंतर भारतीय हवाई दलाने सुखोई-३० एमकेआय (Sukhoi-30 MKI) विमानाच्या मदतीने ब्रह्मोस लॉन्च केले. ब्रह्मोसचा वेग ध्वनीच्या वेगाहून जास्त आहे. या क्षेपणास्त्राचा वापर करून पाणबुडी, जहाज, विमान किंवा जमिनीवरून शत्रूवर मारा केला जाऊ शकतो. ब्रह्मोस-२वरही काम सुरू असल्याची माहिती नौदलाकडून स्पष्ट करण्यात आली आहे.
हेही पहा –