लॉकडाऊन वाढण्याचे संकेत? ‘या’ योजनेची मुदत वाढवली

लॉकडाऊन वाढवण्याच्या दृष्टीने हे पाऊल नाही ना, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

127

राज्यात १ जूननंतरही लॉकडाऊन वाढण्याची शक्यता असून, तसे संकेत आता मिळत आहेत. राज्यात सुरू असलेल्या “ब्रेक दि चेन” मोहिमेंतर्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील विविध समाजघटकांसाठी मदतीचे पॅकेज घोषित केले. त्यामध्ये राज्यातील गरीब आणि गरजू लोकांना १५ एप्रिल पासून पुढे एका महिन्यासाठी मोफत शिवभोजन थाळीची व्यवस्था करण्यात आली होती. ही मुदत आता आणखी एका महिन्यासाठी वाढवण्यात आली असून, राज्यातील गरीब जनतेला १४ जून २०२१ पर्यंत योजनेअंतर्गत मोफत जेवणाची सुविधा उपलब्ध होईल, असे सांगण्यात आले आहे. त्याचमुळे आता लॉकडाऊन वाढवण्याच्या दृष्टीने हे पाऊल नाही ना, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

थाळ्यांच्या संख्येत वाढ 

अन्न व नागरी पुरवठा विभागाने १४ मे २०२१ रोजी यासंबंधीचा शासननिर्णय निर्गमित केला आहे. ब्रेक दि चेन अंतर्गत राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील रोजच्या शिवभोजन थाळ्यांच्या संख्येत दीडपट वाढ करण्यात आली आहे.

(हेही वाचाः …तर जून महिनाही लॉकडाऊनमध्ये जाणार!)

४८ लाखांहून अधिक नागरिकांनी घेतला लाभ

राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी संपूर्ण राज्यभर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. या काळात राज्यातील गोरगरीब जनतेचे हाल होऊ नयेत, याची काळजी शासनाने घेतली आहे. राज्यात १५ एप्रिल २०२१ पासून शिवभोजन योजनेअंतर्गत निःशुल्क थाळी उपलब्ध करुन दिली जात आहे. १५ एप्रिल २०२१  ते २० मे २०२१ पर्यंत ४८ लाख ४४ हजार ७०९ नागरिकांनी मोफत शिवभोजन थाळीचा लाभ घेतला आहे. या अडचणीच्या काळात मोफत शिवभोजन थाळीने राज्यातील गरीब जनतेला मोठा दिलासा दिला आहे.

४ कोटींहून अधिक थाळयांचे वितरण

ही योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत ४ कोटी २७ लाख ८१ हजार ३०६ थाळ्यांचे वितरण राज्यभरात झाले आहे. संपूर्ण राज्यात शिवभोजन योजनेअंतर्गत एकूण ९५० केंद्रं सुरू आहेत.

(हेही वाचाः लॉकडाऊन वाढणार का? काय म्हणाले आदित्य ठाकरे? )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.