Breakup Leave: ना प्रश्न विचारणार, ना पुरावा मागणार; ब्रेकअप झालं की कर्मचाऱ्यांना मिळणार ‘ब्रेकअप लिव्ह’

196
Breakup Leave: ना प्रश्न विचारणार, ना पुरावा मागणार; ब्रेकअप झालं की कर्मचाऱ्यांना मिळणार 'ब्रेकअप लिव्ह'
Breakup Leave: ना प्रश्न विचारणार, ना पुरावा मागणार; ब्रेकअप झालं की कर्मचाऱ्यांना मिळणार 'ब्रेकअप लिव्ह'

स्टॉक ग्रो (Stock Grow) या कंपनीने ब्रेकअप लिव्हसाठी (Breakup Leave) खास धोरण आखले आहे. एखादा कर्मचारी ब्रेकअप लिव्ह (Breakup Leave) घेत असेल तर त्याला कोणताही प्रश्न विचारला जाणार नाही, तसेच त्याच्याकडे ब्रेकअपसाठीचा कोणताही पुरावा मागितला जाणार नाही. कर्मचाऱ्याला सात दिवसांपर्यंत त्याच्या कठीण काळात शांती मिळेल आणि कामावर रुजू झाल्यावर ते चांगल्या प्रकारे काम करतील, असा विचार कंपनीने केला आहे. आपल्या बॉसशी बोलून ही लिव्ह वाढवूनही घेता येऊ शकते. (Breakup Leave)

(हेही वाचा –K Kavita: बीआरएस नेत्या के. कविता यांनी सीबीआय चौकशीविरोधात न्यायालयात घेतली धाव)

नोकरीवर असताना कर्मचारी वेगवेगळ्या कारणांसाठी सुट्टी घेत असतात.एखाद्या कर्मचाऱ्याचं नातं तुटल्यानंतर तो तणावात, दु:खात असेल तर या लिव्हमुळे त्याला फायदा होईल. ब्रेकअप लिव्ह (Breakup Leave) घेतल्यानंतर (Stock Grow Break Up Leave) त्याला या धक्क्यातून बाहेर येण्यास मदत होईल, असं या कंपनीचं मत आहे. (Breakup Leave)

(हेही वाचा – Delhi High Court: परस्पर संमतीने शारीरिक संबंध हा बलात्कार नाही; दिल्ली उच्च न्यायालयाचे मोठे विधान)

स्टॉक ग्रो (Stock Grow) ही एक फिनटेक (fintech) कंपनी आहे. ही कंपनी तिच्या ग्राहकांना ट्रेडिंग, गुंतवणुकीसंदर्भात मार्गदर्शन करते. आमच्याकडे ३ कोटी युजर्स आहेत, असं ही कंपनी सांगते. (Breakup Leave)

हे पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.