झोंबतो गारवा ! गेल्या अकरा वर्षांतील मुंबईतील विक्रमी थंडी

मुंबईकरांची रविवारची सकाळ हुडहुडी भरवणारी ठरलेली असतानाच किमान तापमानापाठोपाठ आता कमाल तापमानही घसरले आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी सोमवारचा दिवस हुडहुडी भरवणारा ठरला. किमान तापमान १७ अंश सेल्सिअसवर नोंदवल्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजता कमाल तापमान ३१.७ अंश सेल्सिअसवर नोंदवले गेले. गेल्या अकरा वर्षांतील नोव्हेंबर महिन्यातील मुंबईमधील हे सर्वात कमी कमाल तापमान ठरले. सायंकाळी साडेसातनंतर मुंबईतील काही ठिकाणी कमाल तापमान चक्क २७.२ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवले गेले.

( हेही वाचा : २ कोटी ज्येष्ठ नागरिकांनी केला मोफत एसटी प्रवास)

उत्तरेतील वा-यांच्या वाढत्या प्रभावामुळे मध्य महाराष्ट्रापाठोपाठ मुंबईतही थंडी वाढत असल्याचा अनुभव सोमवारी येत होता. लोकलने कार्यालयाला जाणा-या मुंबईकरांना थंडीचा चांगलाच अनुभव आला. आता शाल आणि स्वेटर काढण्याची वेळ झाली, अशा चर्चा लोकलमध्ये सुरु झाल्या. दुपारच्या प्रवासातही थंडीचा प्रभाव जाणवत होता. मुंबईत सध्या कमाल आणि किमान तापमानतील घट पाहता मंगळवारी कमाल तापमान ३२ तर किमान तापमान १९ अंश सेल्सिअसपर्यंत खाली येईल, अशी माहिती वेधशाळेच्या अधिका-यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here