शेतकऱ्याकडून सहायक कार्यक्रम अधिकाऱ्याने मागितली लाच

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत मिळालेल्या विहिरीचे काम पूर्ण केल्यावर त्याचे बिल काढण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्याकडून सहायक कार्यक्रम अधिकाऱ्याने 3 हजारांची लाच मागितल्याचा प्रकार मोताळा पंचायत समितीमध्ये घडला आहे. हा व्हिडिओ काढून लाभार्थी शेतकऱ्यानेच पैसे मागण्याचा हा धक्कादायक प्रकार बुलढाणा जिल्ह्यात उघडकीस आला आहे आणि त्याची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली. पण तक्रार करुन 20 दिवस झाले तरीही यावर कारवाई झाली नाही. त्यामुळे वरिष्ठ अधिकारीच अशा लाचखोर अधिकाऱ्याला पाठीशी घालत आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

वर्ष उलटले तरीही बिल दिले नाही

चार वर्षांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यात सारोळा पीर येथील शेतकरी वासुदेव चव्हाण यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची विहीर मंजूर झाली होती. या शेतक-याने मंजूर विहिरीचे खोदकामही केले, त्याचे पहिले बिल काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे विभागातील सहायक कार्यक्रम अधिकारी किरण खिल्लारे यांच्याकडे वर्षभरापूर्वी जमा केली. त्याला वर्ष उलटले तरीही पहिले बिल त्यांनी काढले नाही. अधिकारी खिल्लारे हे शेतकऱ्याकडून जीएसटीचे बिल मागत होते.

(हेही वाचाः घरगुती सिलेंडरच्या दरांमुळे सर्वसामान्य ‘गॅस’वर… पुन्हा वाढल्या किंमती)

३ हजारांची मागणी

विहीर खोदकामचे दुसरेही बिल खिल्लारे या अधिका-याने काढले नाही. आताही जीएसटीचे बिल मागत आहेत. शेतकऱ्याने यामागचे कारण विचारले असता, सहायक कार्यक्रम अधिकारी खिल्लारे यांनी 3 हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर बिल निघेल असे सांगितले नाहीतर जीएसटीचे बिल आणून द्या, असे सांगितले.

शेतक-यानेच काढला व्हिडिओ

शेतकरी वासुदेव चव्हाण यांनी वारंवार विनंती करुनही खिल्लारे यांनी बिलाची फाईल वरिष्ठांकडे पाठवली नाही, तसेच बिलही काढले नाही. शेवटी या सगळ्या प्रकाराला वैतागून शेतकरी चव्हाण यांनी सापळा रचून अधिकारी खिल्लारे यांचा पैसे मागतानाचा व्हिडिओ काढला. त्यावेळी शेतकरी 500 रुपये द्यायला तयार होते. मात्र लाचखोर अधिकारी खिल्लारे हे 3 हजारांवर अडून बसले होते.

(हेही वाचाः राज्यात ४८८ शासकीय शाळा होणार ‘आदर्श’)

तरीही २ हजार घेतलेच

तुम्हाला दिसायला ती फक्त सही दिसते. पण आत काही अडचणी आल्या तर यातील काही पैसे वरिष्ठांकडे अडचणी आल्यावर द्यावे लागतात, असेही तो म्हणाला. नंतर शेतकऱ्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे व्हिडिओसह तक्रार केली. तक्रार करुन 20 दिवस उलटले तरीही अधिकारी खिल्लारेंवर कोणतीच कारवाई झाली नाही आणि तरीसुद्धा खिल्लारे यांनी लाभार्थी शेतकऱ्याकडून 2 हजार रुपये घेतलेच.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here