उत्तरप्रदेशच्या (Uttar Pradesh) कन्नौजमध्ये आज, शनिवारी दुपारी 2.30 वाजता मोठा अपघात झाला. रेल्वे स्थाकावरील बांधकामादरम्यान लिंटेल कोसळून 25 मजूर ढिगाऱ्याखाली गाडले गेलेत. सध्या, ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे.
यासंदर्भात प्राथमिक माहितीनुसार, शटरिंग तुटल्यामुळे ही घटना घडली. बचाव कार्यात मदत करण्यासाठी लखनऊहून एसडीआरएफला पाचारण करण्यात आले आहे. अमृत भारत योजनेअंतर्गत 13 कोटी रुपये खर्चून कन्नौजचे रेल्वे स्थानक विमानतळासारखे विकसित केले जात आहे. यामुळे स्टेशनच्या पुनर्बांधणीचे काम सुरू आहे. स्टेशनच्या एका बाजूला 3 दिवसांपासून लिंटेल टाकण्याचे काम सुरू होते. शनिवारी दुपारी लोखंडी शटरिंगसह लिंटेल कोसळले. (Kannauj Railway Station)
(हेही वाचा – Jana Small Finance Bank Share Price : जन स्मॉल फायनान्स बँकेच्या शेअरमध्ये का होतेय घसरण?)
ज्या ठिकाणी ही घटना घडली तिथे 44 कामगार काम करत होते. या अपघातात सुमारे 25 कामगार अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेत 18 कामगार किरकोळ जखमी झाले आहेत. काहींना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. समाजकल्याण मंत्री असीम अरुण आणि डीएम शुभ्रांत कुमार शुक्ला घटनास्थळी पोहोचले होते. हायड्रा आणि बुलडोझर वापरून बचावकार्य सुरू आहे. ढिगारा काढल्यानंतर मृतांची स्थिती स्पष्ट होईल असे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community