Samruddhi Expressway : समृद्धी महामार्गावरील पुलाला पडले भगदाड; बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित

259
अपघाताच्या मालिकांमुळे सतत चर्चेत असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील (Samruddhi Expressway) पुलाला भगदाड पडले असून, तेथे तात्पुरते कठडे उभारून बाजूने वाहतूक वळविण्यात आली आहे. यामुळे महामार्गाच्या बांधकामाबद्दलच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. समृद्धी महामार्गावर पडलेल्या खड्ड्यामुळे तेथे कठडे उभारून खाऊ वाहतूक बाजूने वळविण्यात आली आहे.

जीवघेणा खड्डा पडला 

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Expressway) लोहगाव येथील पुलावर जीवघेणा खड्डा पडला आहे. काही शेतकरी या मार्गाने जात असताना त्यांना पुलावरील रस्त्याचे काँक्रीट खाली कोसळल्याचे दिसून आले. या खड्ड्यातील लोखंडी सळ्या स्पष्ट दिसत आहेत. याची माहिती वेळीच प्रशासनाला देण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. आता या महामार्गावरच मोठा खड्डा पडल्यामुळे बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. हा महामार्ग ७०१ कि.मी. लांबीचा आहे. दरम्यान, महामार्गाच्या भरवीर ते इगतपुरी या टप्प्याच्या लोकार्पणाचा मुहूर्त ठरला असून, ४ मार्चला (सोमवारी) हा टप्पा वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.