Britain Election Result 2024 : ब्रिटनचे भारतीय वंशाचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पक्षाचा पराभव; लेबर पार्टी मतमोजणीत आघाडीवर

Britain Election Result 2024 : एक्झिट पोलमध्ये देखील कीर स्टार्मर ब्रिटनचे पंतप्रधान होतील. मजूर पार्टी संसदीय निवडणुकीत बहुमताने सत्ता मिळवेल, असे सांगण्यात आले होते.

107
Britain Election Result 2024 : ब्रिटनचे भारतीय वंशाचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पक्षाचा पराभव; लेबर पार्टी मतमोजणीत आघाडीवर
Britain Election Result 2024 : ब्रिटनचे भारतीय वंशाचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पक्षाचा पराभव; लेबर पार्टी मतमोजणीत आघाडीवर

ब्रिटनमध्ये 4 जुलै रोजी पंतप्रधान पदासाठी मतदान झाले. या निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. आतापर्यंतच्या मतमोजणीमध्ये मजूर पक्ष (Labor Party) आघाडीवर असून हुजूर पक्ष पिछाडीवर आहे. आतापर्यंतचे कल पाहता हुजूर पक्षाचे नेते विद्यमान पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak) यांनी पराभव मान्य केला आहे. हुजूर पक्ष पिछाडीवर असला, तरी सुनक यांनी रिचमंड आणि नॉर्थहेलर्टन या जागा राखण्यात यश मिळवले आहे. (Britain Election Result 2024)

(हेही वाचा – खलिस्तानी आतंकवादी Amritpal Singh आणि फुटीरतावादी काश्मिरी नेता Engineer Rashid खासदारकीच्या शपथेला जागणार का ?)

निकालांनंतर सुनक हे लंडनला जाणार आहेत. ‘पंतप्रधान म्हणून मिळालेल्या कार्यकाळात खूप काम केलं. माझं सर्वस्व यामध्ये झोकून दिलं होतं’, अशा भावना ऋषि सुनक यांनी व्यक्त केल्या आहेत.

एक्झिट पोल देखील लेबर पार्टीच्या बाजूने

मतदान झाल्यानंतर समोर आलेल्या एक्झिट पोलमध्ये देखील कीर स्टार्मर ब्रिटनचे पंतप्रधान होतील. मजूर पार्टी संसदीय निवडणुकीत बहुमताने सत्ता मिळवेल, असे सांगण्यात आले होते. ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षाला मोठं नुकसान होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार मजूर पक्षाला 650 पैकी 410 जागांवर विजय मिळेल, असं सांगण्यात आलं होतं. हुजूर पक्षाला त्यांच्या अंतर्गत वादाचा फटका बसल्याचे बोलले जात आहे.

जनतेसाठी दररोज लढू – स्टार्मर

आम्ही लोकांसाठी काम करु, ज्यांनी मतदान केले नाही, त्यांचेदेखील आभार. आम्ही जनतेच्या मुद्यांवर बोलत राहू, जनतेसाठी दररोज लढू, बदलांसाठी तयार आहोत. तुमच्या मतांनी बदल सुरु आहे, अशा शब्दांत स्टार्मर यांनी जनतेचे आभार मानले आहेत. (Britain Election Result 2024)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.