आता आला ब्रिटनवाला!

ब्रिटनमधील नव्या कोरोनाचा विषाणू जगभरात पसरत असताना भारताने तात्काळ ब्रिटनमधून येणारी विमान वाहतूक बंद केली. तरीही देशातील महाराष्ट्र वगळता काही अन्य राज्यात हा विषाणू पसरला. आता महाराष्ट्रातही हा विषाणू आल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले.  

देशात सध्या ब्रिटनमधून प्रसारित झालेल्या कोरोनाच्या नवा विषाणूचा संसर्ग देशभर पसरला आहे. त्यातुन कालपर्यंत महाराष्ट्र सुरक्षित होता. मात्र, आता महाराष्ट्रातही या कोरोनाच्या नव्या विषाणूचा संसर्ग झाला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ब्रिटनमधून महाराष्ट्रात आलेले ८ प्रवासी हे ब्रिटनच्या नव्या विषाणूने बाधित असल्याचे जाहीर केले.

आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले कि, ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील ८ प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणे आढळून आली असून त्यातील मुंबईतील ५, पुणे, ठाणे आणि मीरा भाईंदरमधील प्रत्येकी एक जणांचा समावेश आहे. हे सर्व जण विलगीकरणात असून त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू आहे. दरम्यान या प्रवाशांना थेट विमानतळावरून ताब्यात घेतले कि ते घरी गेल्यावर त्यांच्यात कोरोनाची लक्षणे आढळून आली, हे अद्याप सुस्पष्ट झाले नाही. मात्र आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या ट्विटवर असे म्हटले आहे कि, हे प्रवासी ज्यांच्या संपर्कात आले होते, त्यांचेही ट्रेसिंग सुरु आहे. त्यामुळे हे प्रवासी अन्य ठिकाणी फिरले होते, अशी शंका आली आहे.

(हेही वाचा : आता मुंबईत आणखी एक विभाग ‘शून्यात’!)

लंडन, युके येथून येणारी विमाने होती बंद 

कोरोनाला रोखण्यात काही प्रमाणात यश आले असतानाच ब्रिटन आणि युकेमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आला होता. या नव्या विषाणूमुळे ब्रिटन युकेमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर लंडन, युके येथून येणारी विमानेदेखील २३ डिसेंबरपासून बंद करण्यात आली होती. परंतु आता महाराष्ट्रातही ८ जणांमध्ये या नवीन कोरोनाची लक्षणे आढळून आली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here