१२८ चाकी ट्रक आला आणि पूल कोसळला

136

भारतात मोठ्या संख्येने ब्रिटीशकालीन इमारती आणि वास्तू आहेत. पण यातील अनेक वास्तू मोडकळीस आल्या आहेत. यामुळे अनेकदा अपघात झाल्याच्या घटना घडतात. अशाच प्रकारची एक घटना मध्य प्रदेशातील नर्मदापुरम जिल्ह्यात घडली आहे. येथील सुखतवा नदीवर बांधलेला ब्रिटिशकालीन पूल ट्रकच्या ओझ्याने कोसळला. हा पुल तुटल्याने इटारसी-बैतुलचा संपर्क तुटला आहे.

राष्ट्रीय महामार्गावर मोठी वाहतूककोंडी 

या अपघातात चारजण जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नर्मदापुरम जिल्ह्यातील सुखतवा नदीवर एक ब्रिटीशकालीन पूल होता. मागील अनेक दशकांपासून या पुलावरुन वाहतूक सुरू होती. पण आज या पुलावरुन एक अवाढव्य आकाराची १२८ चाकी ट्रॉली जात होती. या ट्रॉलीचे वजन पूल पेलू शकला नाही आणि त्या ट्रॉलीसह पूल कोसळला. पूल कोसळल्यानंतर राष्ट्रीय महामार्गावर मोठी वाहतूककोंडी झाली होती. प्रशासनाने आता मार्ग वळविण्याची तयारी केली आहे. ही घटना भोपाळ-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर इटारसीच्या पुढे सुखतबा नदीवरील पुलावर घडली. या ट्रॉलीमध्ये इटारसी येथील नॅशनल पॉवर ग्रीडमध्ये बसवल्या जाणारी अवजड यंत्रसामग्री होती. हे सामान हैदराबादहून आणले जात होते.

(हेही वाचा पाकिस्तानच्या होणा-या पंतप्रधानांच्या बायका किती?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.