शिवरायांची वाघनखे आणि जगदंब तलवार परत करण्याबाबत ब्रिटीश उपउच्चायुक्तांचा सकारात्मक प्रतिसाद

84

महाराष्ट्राचा स्वाभिमान, मराठी माणसाचा अभिमान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची ब्रिटन येथे असलेली जगदंब तलवार आणि वाघनखे भारतात आणण्याच्या दृष्टीने ब्रिटिश उपउच्चायुक्त अॅलॅन गॅम्मेल यांनी ब्रिटीश सरकारच्या वतीने सकारात्मक प्रतिसाद दर्शवला. यासंदर्भात शनिवारी मुंबईत त्यांच्याशी झालेली चर्चा अत्यंत समाधानकारक झाली असून त्यामुळे प्रत्येक मराठी माणसाच्या मनातील दृढ निश्चय पूर्ण होणार आहे अशी माहीती राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. ब्रिटनकडून जगदंब तलवार व वाघनखे शिवराज्याभिषेकाच्या ३६० व्या वर्षपूर्तीच्या महोत्सवानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

या चर्चेच्यावेळी ब्रिटीश उच्चायुक्तालयातील राजकीय विभाग विषयक उपप्रमुख इमोजेन स्टोन यादेखील उपस्थित होत्या. शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षपूर्तीचा महोत्सव राज्य शासन राज्यभर मोठ्या प्रमाणात साजरा करणार आहे. त्या अनुषंगाने महाराजांची जगदंब तलवार आणि वाघनखे ब्रिटनकडून मिळविण्याचा संकल्प सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. या प्रयत्नांचा भाग म्हणून शनिवारची बैठक आयोजित करण्यात आली होती.

(हेही वाचा सीबीआयच्या चौकशीला सामोरे जाण्याआधीच अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केली भूमिका)

शिवराज्याभिषेक ३५० व्या वर्षपूर्ती महोत्सवानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंब तलवार आणि वाघनखं भारतात आणण्याबाबत मे च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात ब्रिटनमधे संबंधित अधिकाऱ्यांसमवेत सुधीर मुनगंटीवार यांची बैठक आयोजित करण्याचे ठरविण्यात आले आहे. या प्रस्तावित बैठकीत जगदंब तलवार आणि वाघनखे भारतात आणण्याविषयी तपशीलवार प्रक्रीया ठरविण्यात येणार आहे. शिवराज्याभिषेक ३५० वा वर्षपूर्ती महोत्सव सुरू असतानाच जगदंब तलवार आणि वाघनखे भारतात आणली जातील, अशी शक्यता आहे.

ब्रिटन-महाराष्ट्र सांस्कृतिक देवाण घेवाण होणार

ब्रिटन आणि भारत यांच्यात सांस्कृतिक देवाण घेवाणीवरही या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे. या सांस्कृतिक आदानप्रदानासाठी महाराष्ट्रातील कलाकार ब्रिटन मध्ये सादरीकरण करतील आणि ब्रिटनचे कलाकार महाराष्ट्रात येऊन आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवतील. त्याचबरोबर महाराष्ट्राचे २५ विद्यार्थी ब्रिटनमध्ये अभ्यासासाठी जातील आणि ब्रिटनचे २५ विद्यार्थी महाराष्ट्रात येतील. या सांस्कृतिक आदानप्रदानासंदर्भात महाराष्ट्र शासन आणि ब्रिटीश सरकारमधे लवकरच सामंजस्य करार करण्यात येणार आहे. या सांस्कृतिक संवादातून दोन्ही संस्कृतींना एक नवी उंची प्राप्त होईल, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.