ब्रिटन सरकारने भारतविरोधी खलिस्तान समर्थकांवर मोठी कारवाई केली आहे. खलिस्तानी फंडिंग नेटवर्कचे कंबरडे मोडण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष टास्क फोर्सने खलिस्तान समर्थकांची 300 हून अधिक बँक खाती सील केली आहेत आणि सुमारे 100 कोटी रुपयांची रक्कम जप्त केली आहे. (UK On Khalistan) खलिस्तान समर्थक शीख फॉर जस्टिस (Sikhs for Justice) च्या खात्यातील 20 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत, असे सांगण्यात येत आहे. स्कॉटलंडमध्ये खलिस्तानच्या समर्थनार्थ शीख फॉर जस्टिसने ही रक्कम जमा केली होती.
(हेही वाचा – Ajit Pawar-Supriya Sule : अजित पवार-सुप्रिया सुळे एकाच कार्यक्रमात समोरासमोर; व्यासपिठावरच झाला सवाल-जवाब)
स्पेशल टास्क फोर्सने या सर्व बँक खात्यांमधून कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये केलेल्या संशयास्पद व्यवहारांचा मागोवा घेतला होता. गेल्या वर्षी स्थापन करण्यात आलेल्या ब्रिटिश टास्क फोर्सच्या वॉच लिस्टमध्ये पाच हजारांहून अधिक बँक खाती आहेत. टास्क फोर्सने या खात्यांची दोन प्रकारात विभागणी केली आहे. जी थेट घोषित खलिस्तानी नेत्यांची आहेत आणि जी खलिस्तान समर्थकांची आहेत, अशा दोन प्रकारांत हे विभाजन करण्यात आले आहे.
निधी रोखण्यासाठी प्रयत्न
अमेरिकेतील खलिस्तान समर्थकांचे नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी टास्क फोर्सने तपास यंत्रणा एफबीआयशीही संपर्क साधला आहे. टास्क फोर्सच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, भारतातील प्रतिबंधित संघटनांच्या अमेरिकास्थित नेत्यांना मिळणारा निधी रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सार्वमत पथक पुढील महिन्यात अमेरिकेला जाणार आहे. बँक खाती जप्त करण्याची कारवाई अधिक तीव्र केल्यास हवालाच्या माध्यमातून निधी मिळण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी अशी कारवाई करण्याची मागणी केली होती. (UK On Khalistan)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community