‘कोडवर्ड’ने ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर विकला जायचा ब्राऊनी केक!

कोणी किती ब्राऊनी खावी, किती खाऊ नये, एका ब्राऊनीची नशा किती तास असेल, याची इत्यभूत माहिती अटकेत असलेला मानसोपचा तज्ज्ञ चारनिया हा आपल्या ग्राहकांना देत असे, अशी माहिती एनसीबीच्या चौकशीत समोर आली.

70

मुंबईत अमली पदार्थ मिश्रित ब्राऊनी केकची विक्री विशिष्ट कोडवर्डच्या माध्यमातून होते. या ब्राऊनीला ‘हॅश ब्राऊनी’ आणि ‘इडेबल ब्राऊनी’ हे कोडवर्ड देण्यात आले होते. या प्रकरणी एनसीबीने कारवाई केली.

मानसोपचार तज्ज्ञांच्या चौकशीतून धक्कादायक माहिती मिळाली! 

एका ‘व्हॉट्सअ‍ॅप’ वर विशिष्ट कोडवर्डच्या माध्यमातून अमली पदार्थ मिश्रित ब्राऊनीची विक्री सुरू होती, अशी माहिती नुकतीच एनसीबीने अटक केलेल्या मानसोपचार तज्ज्ञांच्या चौकशीत समोर आली. काही महिन्यांपूर्वी एनसीबीने मालवणी येथील एका बेकरीवर कारवाई करून गांजाचा अर्क टाकून तयार करण्यात आलेल्या ब्राऊनी केक जप्त करून दोघांना अटक केली होती. या बेकरीवर केलेल्या कारवाईनंतर माझगाव येथून अटक करण्यात आलेल्या मानसोपचार तज्ज्ञांच्या बेकरीत तयार होणाऱ्या हाशीश मिश्रित ब्राऊनीची विक्री क्रित्येक पटीने वाढली होती, अशी माहिती मानसोपचार तज्ज्ञ रहमीन चारनिया याच्या चौकशीत समोर आली.

(हेही वाचा : परकीय मुसलमान आक्रमणकर्त्या मुघलांचा इतिहास यूजीसी ‘पुसणार’!)

तरुणी, महिलांची जास्त पसंती!

चारनिया याने एक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार केला होता, त्या ग्रुपवर तो सर्व प्रकारच्या ‘ब्राऊनी केक’ची ऑर्डर घेत असे, त्यात इडेबल ब्राऊनी, हॅश ब्राऊनी या कोडवर्डने येणाऱ्या ऑर्डर स्पेशल ऑर्डर असायच्या, हॅश ब्राऊनीला तरुणी आणि महिलांकडून अधिक पसंती होती, असेही चौकशीत समोर आले आहे. कोणी किती ब्राऊनी खावी, किती खाऊ नये, एका ब्राऊनीची नशा किती तास असेल, याची इत्यभूत माहिती अटकेत असलेला मानसोपचा तज्ज्ञ चारनिया हा आपल्या ग्राहकांना देत असे अशी माहिती एनसीबीच्या चौकशीत समोर आली आहे.

महागड्या अमली पदार्थाला मागे टाकले!

अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या तरुणाईमध्ये ब्राऊनीची नवीनच क्रेझ आली आहे, या ब्राऊनीमध्ये विशेष करून गांजा, हशीस, अफू या अमली पदार्थाचा वापर करण्यात येत आहे, स्वस्त आणि अधिक काळ नशा टिकून राहण्यासाठी ब्राऊनी केकची मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे बोलले जात आहे. गांजा, विड्स, चरस, अफू या अमली पदार्थाने कोकेन, हेरॉईन, एलएसडी पेपर, एमडी, ब्राऊन शुगर इत्यादी महागड्या अमली पदार्थाला मागे टाकले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.