-
ऋजुता लुकतुके
बाँबे स्टॉक एक्सचेंज या देशातील आघाडीच्या शेअर बाजाराने एक नवीन मापदंड सर केला आहे. बाजारात ट्रेड होणाऱ्या सर्व कंपन्यांचं बाजार मूल्य प्रथमच ४ ट्रिलियन अमेरिकन डॉलरच्या वर गेलं आहे. (BSE Market Cap Reaches 4 Trillion)
हा आठवडा भारतीय शेअर बाजारांच्या इतिहासात ऐतिहासिक असाच म्हणावा लागेल. बुधवारी २९ नोव्हेंबरला बाँबे स्टॉक एक्सचेंज या शेअर बाजारात ट्रेड होणाऱ्या कंपन्यांचं बाजारमूल्य चक्क ४ ट्रिलियन अमेरिकन डॉलरच्या वर गेलं. हा टप्पा सर करण्याची भारतीय शेअर बाजाराची ही पहिलीच खेप आहे. (BSE Market Cap Reaches 4 Trillion)
आणि फक्त बाजारमूल्याचा निकष धरला तर बीएसई आता जगातील पाचव्या क्रमांकाचा मोठा शेअर बाजार ठरला आहे. गुरुवारचा ताजा आढावा घेतला तर हे मूल्य ३३३ लाख कोटी रुपये इतकं आहे. म्हणजेच डॉलरचा भाव ८३.३० रुपये इतका धरला तर हे मूल्य ४ ट्रिलियन अमेरिकन डॉलरमध्ये जातं. (BSE Market Cap Reaches 4 Trillion)
महत्त्वाचं म्हणजे या वर्षीच्या सुरुवातीपासून शेअर बाजारात ६०० अब्ज अमेरिकन डॉलरची वाढ झाली आहे. (BSE Market Cap Reaches 4 Trillion)
Market capitalisation of BSE listed firms hits USD 4 trillion-mark for first time ever
— Press Trust of India (@PTI_News) November 29, 2023
(हेही वाचा – Narayana Murthy : भारतियांनी 3 शिफ्टमध्ये काम करावे; नारायण मूर्ती यांचे कामाच्या तासांविषयी पुन्हा भाष्य)
बीएससीने आतापर्यंत केलेली प्रगतीही अतिशय वेगवान अशीच आहे. २००७ मध्ये पहिल्यांदा बीएससीने १ ट्रिलियन अमेरिकन डॉलरचं मूल्य गाठलं होतं आणि मूल्यांकन २ ट्रिलियनवर जाण्यासाठी शेअर बाजाराला दहा वर्ष वाट पहावी लागली. पण, ३ ट्रिलियन ते ४ ट्रिलियन अमेरिकन डॉलरचा टप्पा बीएससीने मागच्या २ वर्षांत म्हणजे मे २०२१ ते डिसेंबर २०२३ मध्येच गाठला आहे. (BSE Market Cap Reaches 4 Trillion)
परकीय गुंतवणूकदार संस्थांनी आणि संस्थागत गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजाराच्या या प्रगतीत मोठा वाटा उचलला आहे. (BSE Market Cap Reaches 4 Trillion)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community