अमृतसरमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर पुन्हा एकदा पाकिस्तानी तस्करांच्या ड्रोनने घुसखोरी केली. हे ड्रोन पाडण्यात सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांना यश आले आहे. शोध घेतल्यानंतर जवानांनी ड्रोन ताब्यात घेतला आहे. त्याचवेळी या ड्रोनसोबत हेरॉईनची एक खेपही जप्त करण्यात आली आहे, ज्याची आंतरराष्ट्रीय किंमत २१ कोटी रुपये आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमृतसरच्या आंतरराष्ट्रीय सीमा अटारी अंतर्गत रत्नखुर्द गावाजवळ बीएसएफ जवानांना हे यश मिळाले आहे.
(हेही वाचा – २५ वर्षांची प्रतीक्षा संपली; वाशीमध्ये होणार भव्य ‘महाराष्ट्र भवन’)
बीएसएफचे जवान गस्तीवर असताना रविवारी रात्री ९.४५ वाजता ड्रोनचा आवाज आला. त्यावेळी सैनिकांनी गोळीबार सुरू केला. काही मिनिटांनी ड्रोनचा आवाज बंद झाला. त्यानंतर जवानांनी परिसरात शोधमोहीम सुरू केली. शोध घेत असताना अटारी येथील शेतात जवानांना ड्रोन सापडले. ड्रोनचे तुकडे झाले होते. जवळच एक पिवळ्या रंगाची बॅश सापडली, जी ड्रोनसोबत भारतीय सीमेवर पाठवण्यात आली. जवानांनी बॅग ताब्यात घेऊन सुरक्षा तपासणी सुरू केली.
या तपासणी दरम्यान बॅग उघडली असता त्यात हेरॉइनची खेप होती. ज्याचे एकूण वजन ३.२ किलो होते. ड्रोन आणि हेरॉईनचे नमुने तपासणीसाठी पाठवण्याची तयारी सुरू आहे. बीएसएफने दिलेल्या माहितीनुसार, या महिन्यातील हे पहिले ड्रोन आहे, जे जवानांनी पाडले आहे. यापूर्वी दोन खेप जप्त करण्यात आल्या होत्या.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community