आज १ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी ११ वाजता केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यास सुरूवात केली. यावेळी तरूणांना दिलासा मिळाल्याचे दिसून आले. केंद्रीय अर्थसंकल्पात तरूणांसाठी ६० लाख नव्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करणार असल्याची घोषणा मोदी सरकारने केली. २०२२-२०२३ या वर्षासाठीच्या अर्थसंकल्पात मोदी सरकारने तरूणांना दिलासादायक बातमी दिली असून राष्ट्रीय कौशल्य योजनेतून तरूणांना नोकरीसाठी प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.
काय म्हणाल्या अर्थमंत्री
आत्मनिर्भर भारतअंतर्गत १६ लाख नोकऱ्या देण्यात येणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी म्हटलं आहे. कंपन्यांच्या मागणीनुसार तरुणांना प्रशिक्षण देण्यात येईल जेणेकरुन तरुणांना रोजगार उपलब्ध होईल, असे केंद्र सरकारचे धोरण आहे. नॅशनल स्किल क्वालिफीकेशन प्रोग्राम हा ट्रेनिंग प्रोग्राम आहे. सध्याची जी इंडस्ट्रीची मागणी बदलत आहे. त्या दृष्टीने युवकांना ट्रेनिंग देण्यात यावे यासाठी योजना करण्यात आली आहे. असे निर्मला सीतारामण म्हणाल्या आहेत. केंद्राकडून २०२२-२०२३ या वर्षांसाठी अर्थसंकल्प सादर करण्यात आला. दरम्यान, संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्री निर्मला सीतारामण शेती, डिजिटल, नोकरी आणि आरोग्य क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत.
आत्मनिर्भर भारत के अंतर्गत 16 लाख नौकरियां दी जाएंगी।
मेक इन इंडिया के तहत 60 लाख नौकरियां आएंगी।#AatmanirbharBharatKaBudget pic.twitter.com/UeoSMHwSlD
— BJP (@BJP4India) February 1, 2022
आत्मनिर्भर भारतअंतर्गत १६ लाख नोकऱ्या देण्यात येणार तर मेक इन इंडियाअंतर्गत ६० लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत, अशी घोषणा केंद्रीय अर्थसंकल्पातून कऱण्यात आली. केंद्र सरकार नेहमीच तरूणांना रोजगाराच्या संधी निर्माण करून देण्याच्या मुद्द्यावरून निशाण्यावर असते. दरम्यान, नव्या रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करून विरोधकांना केंद्रीय अर्थसंकल्प उत्तर असेल का हे आगामी काळात पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
(हेही वाचा – Budget 2022 : आता टीव्हीद्वारे पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण)
रेल्वे, रस्ते, हवाई जल वाहतुकीसाठी मोठी गुंतवणूक
पंतप्रधान गती शक्ती योजनेमार्फत पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात येतील. देशात ६० लाख नव्या नोकऱ्या उपलब्ध होतील. आगामी काळात रेल्वे, रस्ते, हवाई जल वाहतुकीसाठी मोठी गुंतवणूक केली जाणार आहे. तसेच लवकरच LIC चा IPO बाजारात आणला जाणार असल्याची घोषणाही अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केली. मात्र या नोकऱ्या कोणत्या क्षेत्रात असतील, त्यासाठी लागणाऱ्या निधी संदर्भात कोणताही उल्लेख त्यांच्या भाषणात करण्यात आला नव्हता.