Budget 2022 : आता टीव्हीद्वारे पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण

94

कोरोना काळात शाळा-महाविद्यालये बंद होती, त्यामुळे ऑनलाईन शिक्षण सुरु झाले, तेव्हापासून डिजिटल शिक्षण पद्धत रुळत चालली. यंदाच्या अर्थसंकल्पात या बदलत्या शिक्षण व्यवस्थेला प्रोत्साहन देण्यात आले. शालेय शिक्षण असो की उच्च शिक्षण , सोशल डिस्टन्सिंग आणि लॉकडाऊनमुळे पारंपरिक शिक्षण पद्धतीऐवजी डिजिटल पद्धतीने अभ्यास आणि परीक्षा घेतल्या जात आहेत. त्याचबरोबर शालेय आणि उच्च शिक्षणात नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्याची प्रक्रियाही देशात सुरू आहे. त्यामुळे अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी शालेय शिक्षणासाठी देशभरात २०० टीव्ही चॅनेल्स सुरू करणार असल्याची घोषणा केली.

२०० चॅनेल्स सुरू करणार

कोरोनामुळे देशातील छोट्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहावं लागले आहे. वन क्लास वन टीव्ही चॅनलद्वारे हे प्रयत्न केले जाणार आहेत. शालेय शिक्षणासाठी २०० चॅनेल्स सुरू करणार. या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्थानिक भाषेत शिकवले जाणार आहे. रेडिओ, टीव्हीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण मिळणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी म्हटले. वन क्लास वन टीव्ही चॅनेलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या विकासासाठी पहिली ते बारावीसाठी चॅनेल सुरू करणार आहे. प्रादेशिक भाषांमध्ये हे चॅनेल काम करतील. यासाठी इंटरनेट रेडिओ आणि डिजिटल साधनांचा वापर करण्यात येईल. डिजिटल विद्यापीठ सुरू करणार असून हे विद्यापीठ देशातील प्रादेशिक भाषांमध्ये सुरू होणार आहे. ई कंटेन्ट तयार करण्यासाठी देशातील मोठी विद्यापीठ आणि सरकार एकत्र काम करणार असल्याचं सीतारामन यांनी म्हटले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.