केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२२-२३ चा अर्थसंकल्प सादर केला. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य लोकांना यंदाच्या बजेटकडून मोठ्या अपेक्षा आहेत. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदाचा अर्थसंकल्प सादर होत आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सामान्यांना पडणारा सर्वांत महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आपल्या खिशावर किती भार पडणार? कोणत्या वस्तू महाग होतील आणि कोणत्या स्वस्त होणार आहेत? निर्मला सीतारमण यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात कोणत्या वस्तू महाग झाल्या आहेत आणि कोणत्या स्वस्त हे पाहूया.
अनेक जीवनापयोगी वस्तू स्वस्त करत मोदी सरकारने सामान्यांना दिलासा दिला आहे. मोबाईल फोन चार्जरचा ट्रान्सफार्मर आणि कॅमेरा लेन्सवरील आयात शुल्क घटवण्यात आलं आहे.
( हेही वाचा : केंद्रीय अर्थसंकल्प २०२२ : आयकर आकारणीत काहीही बदल नाही! )
Budget 2022 काय स्वस्त?
– शेतीशी निगडीत वस्तू, अवजारे, कृषी उपकरणे
– मोबाईल फोन, चार्जर
– पॉलिश केलेले हिरे, मौल्यवान रत्न ( कस्टम ड्युटी ५ टक्क्यांनी कमी)
– इलेक्ट्रॉनिक्स वस्तू
– इम्पोर्टेड केमिकल वस्तू
– कपडे
– चामड्याचा वस्तू
– कॅमेरा लेन्स
– पेट्रोलियम उत्पादनांसाठी लागणारी रसायने
– पॅकिंगसाठी वापरले जाणारे डबे
– स्टील स्क्रॅप्स
काय महाग ?
– आयात होणारे खोटे दागिने
-क्रिप्टो करन्सी गुंतवणूक
– भांडवली वस्तू (कॅपिटल्स गुड्सवर) आयात शुल्कावरील सूट रद्द करण्यात आली आहे. आता कॅपिटल्स गुड्सवर 7.5 टक्के आयात शुल्क आकारण्यात येणार आहे.