Budget 2024 : विरोधकांच्या बेरोजगारीच्या आरोपाला अर्थसंकल्पातून प्रत्युत्तर; नव्या रोजगार निर्मितीसाठी २ लाख कोटींची तरतूद

129
Union Budget 2024 : रोजगार, कृषि कर्ज आणि उद्योगांना चालना; नवीन अर्थसंकल्पात कुणासाठी किती तरतूद?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवार, 23 जुलै रोजी एनडीए सरकारचा पहिला अर्थसंकल्प संसदेत मांडला. काही वेळापूर्वीच निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पाच्या वाचनाला सुरुवात केली. या अर्थसंकल्पात (Budget 2024) देशातील रोजगार वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण योजनांची घोषणा करण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (nirmala Sitharaman) यांनी रोजगार आणि कौशल्य विकासासाठी तीन नव्या योजनांबाबत संसदेत माहिती दिली. या योजनांच्या माध्यमातून पहिल्यांदा नोकरीला लागणाऱ्या तरुणांना केंद्र सरकारकडून प्रोत्साहनपर भत्ता दिला जाणार आहे.

(हेही वाचा – मध्य रेल्वेचे सजग ‘Loco Pilot’ खरे जीवन रक्षक)

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीसाठी होणाऱ्या नोंदणीच्याआधारे हा प्रोत्साहनपर भत्ता दिला जाईल. पहिल्यांदा नोकरीला लागणाऱ्या तरुणांना आणि त्यांच्या कंपन्यांना या योजनांमुळे फायदा होणार आहे.

स्कीम ए योजना

या तीन योजनांपैकी पहिल्या म्हणजे स्कीम ए मध्ये संघटित क्षेत्रात पहिल्यांदा कामाला लागणाऱ्या तरुणांना प्रोत्साहनपर भत्ता दिला जाईल. या नोकरदारांच्या बँक खात्यात तीन टप्प्यांत थेट पैसे जमा केले जातील. या योजनेनुसार नव नोकरदारांना 15 हजारापर्यंतचा प्रोत्साहनपर भत्ता अर्थात Incentive दिला जाईल. महिन्याला 1 लाख रुपयापर्यंत वेतन असणारे नोकरदार या योजनेसाठी पात्र असतील. हे पैसे EPFO खात्यात जमा होतील. या योजनेमुळे 2 कोटी 10 लाख तरुणांना फायदा होईल, असे निर्मला सीतारामन यांनी सांगितले.

रोजगार आणि कौशल्य विकास स्कीम बी योजना

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषणा केलेल्या स्कीम बी योजनेचे प्रमुख उद्दिष्ट उत्पादन क्षेत्रातील रोजगार वाढवणे हे आहे. त्यासाठी पहिल्यांदा नोकरीला लागणारे तरुण आणि त्यांची कंपनी या दोघांनाही भविष्य निर्वाह निधीत जमा करणाऱ्या रक्कमेच्या हिशेबाने इन्सेन्टिव्ह देण्यात येईल. पहिली चार वर्षे संबंधित नोकरदार आणि संबंधित कंपनीला हा प्रोत्साहनपर भत्ता दिला जाईल.

स्कीम सी – रोजगार आणि कौशल्य विकास

नव्याने नोकरीला लागणाऱ्या नोकरदारांना पाठिंबा देण्यासाठी केंद्र सरकारच्या रोजगार आणि कौशल्य विकास स्कीम सी अंतर्गत सर्व क्षेत्रातील नोकरदारांना प्रोत्साहनपर भत्ता दिला जाईल. एखादा तरुण पहिल्यांदा नोकरीला लागल्यानंतर त्याची कंपनी भविष्य निर्वाह निधीसाठी किती पैसे जमा करते, याआधारे संबंधित नोकरदाराला दोन वर्षे महिन्याला 3000 रुपयांपर्यंतची रक्कम परत केली जाईल. यामुळे 50 लाख अतिरिक्त रोजगार निर्माण होण्यास मदत होईल, अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. (Budget 2024)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.