- ऋजुता लुकतुके
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप (Donald Trump) यांनी आपल्या दुसऱ्या कार्यकालात, ‘अमेरिका फर्स्ट,’ धोरणाची क़क अंमलबजावणी सुरू केली आहे. अमेरिकन नागरिकांना श्रीमंत करू अशी घोषणा करतानाच राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकन नागरिकांसाठी आयकर (Income tax) रद्द करण्याचं सूतोवाच केलं आहे. आणि सरकारी महसूलातील ही दरी परदेशातून होणाऱ्या आयातीवरील करांनी भरून काढू, असं ट्रंप प्रशासनाचं म्हणणं आहे. (Budget 2025)
फ्लोरिडा इथं एका भाषणात बोलताना ट्रंप यांनी हे विचार बोलून दाखवले आहेत. ‘अमेरिकेला ज्या धोरणाने शक्तिशाली आणि समृद्ध बनवलं, त्या धोरणाकडे परत जाऊया,’ असा ट्रंप (Donald Trump) यांच्या भाषणाचा आशय होता. एएफपी वृत्तसंस्थेनं ही बातमी दिली आहे. इतकंच नाही तर परकीयांवर जास्तीचा कर लावून अमेरिकेनं पुन्हा श्रीमंत झालं पाहिजे, असं त्यांनी बोलूनच दाखवलं आहे. ट्रंप यांच्या अलीकडच्या धोरणांशी हे वागणं मिळतं जुळतं आहे. (Budget 2025)
(हेही वाचा – Virat Kohli : रेल्वे विरुद्धच्या सामन्यासाठी विराट कोहली दिल्ली रणजी संघात दाखल)
JUST IN: President Trump appears to call for the end of federal income tax, says it’s time America returns to the “system that made us richer.”
“It’s time for the United States to return to the system that made us richer and more powerful than ever before.”
“Instead of taxing… pic.twitter.com/ylMoX34GaB
— Collin Rugg (@CollinRugg) January 28, 2025
‘अमेरिका पहिल्या सारखी श्रीमंत होणार आहे. आणि हे लवकरच घडून येईल. त्यासाठी आपल्याला जुन्या धोरणांकडे पुन्हा एकदा वळावं लागेल,’ असं ट्रंप (Donald Trump) या भाषणात म्हणाले. १९१८ च्या पूर्वी अमेरिकेत आयकरच (Income tax) नव्हता, हे उदाहरणही त्यांनी दिलं. त्या धोरणातून अमेरिकन (American) श्रीमंत झाले आणि सरकारकडेही पैसा राहिला, असं सांगत त्यांनी रुझवेल्ट यांचं उदाहरण दिलं. रुझवेल्ट यांच्या कालावधीत आयकर नव्हता. पण, त्यांनी सर्वाधिक जनहिताची कामं केली. देशभर राष्ट्रीय उद्यानं उभी केली. कारण, टॅरिफमधून सरकारला पैसा मिळत होता, असं ट्रंप म्हणाले. (Budget 2025)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community