
राज्यात वाघांची संख्या वाढल्यामुळे नागरिकांच्या जीवितासह शेतीचे मोठे नुकसान होत आहे. भंडारा जिल्ह्यालगत असलेल्या कोका वन्यजीवन अभयारण्याच्या बफर झोनमधील एका गावात वाघाने महिलेवर हल्ला करून तिचा जीव घेतला. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी वन विभागाच्या विरोधात चक्काजाम आंदोलन केले. तसेच, बिबट्यांच्या हल्ल्यामुळेही जीवितहानी होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. (Budget Session 2025)
या पार्श्वभूमीवर काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी विधानसभेत लक्षवेधी प्रश्न उपस्थित करत, ज्या गावांमध्ये वाघ आणि बिबट्यांचा वावर आहे, त्या गावांना साखळी कुंपण घालण्याची मागणी केली. त्यांनी सांगितले की, वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांना शेतीच्या कामात अडथळा येत आहे. शेतकरी भयभीत असल्याने शेती हंगामात शेतात जाऊ शकत नाहीत. त्यामुळे जंगलालगतच्या गावांची नोंद घेऊन सोलर किंवा साखळी कुंपण करण्याची तातडीची आवश्यकता आहे. (Budget Session 2025)
(हेही वाचा – कोर्टाच्या तारखा लवकर मिळतात, पण एमआरआय-सिटी स्कॅनसाठी प्रतीक्षा ; Rahul Narwekar यांची नाराजी)
या मुद्द्यावर उत्तर देताना वनमंत्री गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी वाघांची संख्या २००० साली १०१ होती, जी २०२५ पर्यंत ४४४ पर्यंत वाढली आहे, असे स्पष्ट केले. वाघ आणि बिबट्यांच्या हल्ल्यांवर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने सोलर फेन्सिंगसाठी २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. तसेच, साखळी कुंपणासाठीही सरकार सकारात्मक असून, त्यासंदर्भात लवकरच पुढील निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी आश्वासन दिले. (Budget Session 2025)
वाघ आणि बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे वाढलेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी शुक्रवारी संबंधित लोकप्रतिनिधींसोबत विशेष बैठक घेण्याचे निर्देश दिले आहेत. या बैठकीत वाघ आणि बिबट्यांपासून नागरिकांचे रक्षण करण्यासाठी पुढील उपाययोजना ठरवण्यात येणार आहेत. (Budget Session 2025)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community