Budget Session 2025: अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधक शांत; विरोधी पक्षनेता कोण होणार यावर संभ्रम

45

मुंबई प्रतिनिधी : 

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Budget Session 2025) पहिल्याच दिवशी पायऱ्यावर कोणतेही आंदोलन झाले नाही, त्यामुळे विरोधक कमकुवत असल्याची भावना निर्माण झाली आहे. विरोधी पक्षनेता (Opposition Leader) पदासाठी अजूनही विरोधकांमध्ये एकमत नाही. (Budget Session 2025)

(हेही वाचा – Vishva Hindu Parishad च्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याप्रकरणी २ अधिकाऱ्यांसह ५ पोलिसांच्या बदल्या)

काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद हवे, पण…
विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेसने आपला दावा सांगितला असला तरी, शिवसेना उबाठा (Shivsena UBT) त्यासाठी तयार नाही. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress) पक्षाची भूमिका वेगळीच दिसत आहे. विरोधी पक्षनेते पदासाठी आवश्यक संख्याबळ नसल्याने विरोधक पहिल्याच दिवशी शांत असल्याचे पाहायला मिळाले.

(हेही वाचा – Election : निवडणुकांचे फटाके दिवाळीत फुटणार?; सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष)

विरोधकांत फूट – सत्ताधाऱ्यांचा फायदा?
विरोधी पक्षांमध्ये (opposition party) स्पष्ट एकजूट नसल्याने सत्ताधारी पक्षाला फायदा होणार आहे. विरोधी पक्षनेतेपद कोणाला मिळणार, याचा निर्णय आता राजकीय समीकरणांवर आणि सत्ताधाऱ्यांच्या धोरणावर अवलंबून आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.