छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानाच्या मुद्द्यावरून आज विधान परिषदेमध्ये जोरदार गदारोळ झाला. औरंगजेब बादशहाची स्तुती करणाऱ्या अबू आझमींच्या निलंबनाचा निर्णय सरकारने घेतला. त्यानंतर विरोधकांनी प्रशांत कोरटकर याने केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानाचा (Chhatrapati Shivaji Maharaj Insults) मुद्दा उपस्थित केला. त्या वेळी विरोधकांना प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आक्रमक भूमिका घेतली. (Budget Session 2025)
मुख्यमंत्री म्हणाले, कोरटकर वगैरे चिल्लर लोक आहेत, त्यांच्यावर कारवाई होणारच, पण तुम्ही पंडित जवाहरलाल नेहरू (Jawaharlal Nehru) यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडियामधून (Discovery of India) छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या लिखाणाचा निषेध करणार का ? कोरटकरला १०० टक्के अटक होईल. मात्र त्याने कोल्हापूरमधील न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळवला आहे. मात्र त्या विरोधात मी वरच्या कोर्टात जाण्यास सांगितले आहे. ही कोरटकर वगैरे माणसे चिल्लर आहेत. जितेंद्र आव्हाड काय बोलले होते, त्याचा तुम्ही कधी निषेध केलेला नाही. औरंगजेब होता म्हणून शिवाजी महाराजांना ओळखले जाते, औरंगजेब किती बलाढ्य होता आणि शिवाजी महाराज पाच फुटाचे होते, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले होते. हे रेकॉर्डवर आहे, याचा तुम्ही निषेध केलेला नाही. असा सिलेक्टिव्ह निषेध करू नका,
आबू आझमी यांच्या निलंबन प्रस्तावानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी जोरदार भाषण दिले. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ”चंद्रकांतदादा पाटील यांनी सादर केलेल्या अबू आझमींच्या निलंबनाच्या प्रस्तावात अजून काही बाबींचा समावेश करण्याची आवश्यकता आहे. विधान परिषदेच्या या प्रस्तावात अबू आजमींचे निलंबन हे केवळ या अधिवेशनापुरतेच का ?, असा सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला. विधान परिषदेमध्ये एका सदस्याने भर सभेत जाहीर देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांबद्दल भाष्य केले. तेव्हा तुम्ही काय शिक्षा केली ? त्या वेळी आमदारांची समिती गठित करण्यात आली, तोपर्यंत त्याचे सदस्यत्व रद्द केले. सोबतच त्याचा पगार रद्द केला. रेल्वे कुपन बंद केलं. आमदार निधीही बंद केला. दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराजांना आपण देवापेक्षा जास्त मानतो. नथुराम गोडसे बद्दल एकाने वक्तव्य केलं तर त्याला जेलमध्ये टाकण्यात आलं. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा हा अप्रत्यक्षपणे अपमान नाही आहे का ? सध्या देशभरात छावा सिनेमा सुरू आहे. त्या छावा सिनेमातील एक कवी कलशांचा संवाद आहे, त्यात ते म्हणतात ‘हाती-घोडे, तोफ, तलवारे फौंज तेरी सारी हैं, पर जंजीर मे जकडा शंभूराजा मेरा अब भी सब पे भारी हैं, अशा शब्दात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात भाष्य केलंय.
त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेल्या डिस्कव्हरी ऑफ इंडियाचा उल्लेख केला. ते म्हणाले की, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे लिहिले आहे, त्याचा तुम्ही निषेध करणार आहात का? आहे का हिंमत? असा सवाल विरोधकांना केला.
फडणवीस यांनी हा उल्लेख करताच विरोधकांनी गोंगाट करून जोरदार गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. ”आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान सहन करणार नाही. त्यामुळे पंडित नेहरू यांचाही निषेध झाला पाहिजे”, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. (Budget Session 2025)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community