पालघरमध्ये मोठे विमानतळ उभारा; Devendra Fadnavis यांची पंतप्रधान मोदींकडे मागणी

मुंबईमधील पोर्ट आणि जेएनपीटी पोर्टमुळे आपण एक नंबर ठरलो. आता त्याहीपेक्षा तीनपट मोठं वाढवण बंदर तयार होत आहे, असे Devendra Fadnavis यांनी म्हटले आहे.

104
पालघरमध्ये मोठे विमानतळ उभारा; Devendra Fadnavis यांची पंतप्रधान मोदींकडे मागणी
पालघरमध्ये मोठे विमानतळ उभारा; Devendra Fadnavis यांची पंतप्रधान मोदींकडे मागणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते ३० ऑगस्ट रोजी ७६ हजार कोटी रुपयांच्या वाढवण बंदर (Vandhavan Port) प्रकल्पाचे भूमीपूजन करण्यात आले. या वेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पंतप्रधानांकडे विशेष मागणी केली आहे.

“मी आज एक विनंती करू इच्छितो. जगभरात अनेक ठिकाणी विमानतळं अशा प्रकारे तयार केलेले आहेत. येणाऱ्या काळात मुंबई अजून वाढणार आहे. वसई विरार, पालघर (Palghar) या ठिकाणीही मुंबई वाढेल. आज आपण वाढवण बंदराचं भूमिपूजन करत आहोत. याचबरोबर आपण विमानतळाबाबतचा निर्णय देखील घेतला आणि पालघरमध्ये तिसरं मोठं विमानतळ उभारलं, तर आपण मुंबईला नक्कीच बदलू शकतो”, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली.

(हेही वाचा – स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करूनही ते माफी मागत नाहीत; PM Narendra Modi यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल)

देशाच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल

वाढवण बंदर प्रकल्प हा जागतिक दर्जाचा प्रकल्प असणार आहे. या वाढवण बंदर प्रकल्पाच्या माध्यमातून मोठमोठ्या कंटेनर जहाजांना या बंदरांवर थांबा घेता येणार आहे. या प्रकल्पामुळे देशाच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल असं सांगितलं जात आहे. वाढवण बंदर प्रकल्प हा पालघर जिल्ह्यातील डहाणू शहराजवळ आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानत वाढवण बंदरामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव इतिहासात कोरलं जाईल, असं म्हणत वाढवण बंदर प्रकल्पानंतर आता पालघरमध्ये एक विमानतळ उभारण्यात यावं, अशी मागणी फडणवीसांनी केली.

या वेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “आजचा दिवस हा इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिण्यासारखा आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहे की, देशाची आर्थिक राजधानी मुंबई आहे. मुंबईमधील पोर्ट आणि जेएनपीटी पोर्टमुळे आपण एक नंबर ठरलो. आता त्याहीपेक्षा तीनपट मोठं वाढवण बंदर तयार होत आहे. गेले ३० ते ४० वर्ष आपण मुंबई पोर्ट आणि जेएनपीटी पोर्टमुळे एक नंबर ठरलो. मात्र, आता वाढवण बंदरामुळे पुढील ५० वर्ष महाराष्ट्र एक नंबर राहील. हे सर्व फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे शक्य झालं आहे.”

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.