अविनाश भोसलेंची 40 कोटींची मालमत्ता जप्त!

अविनाश भोसले यांच्या विदेशी बँकामध्ये आयबीच्या परवानगीशिवाय ५०० कोटी रुपये जमा करण्यात आले होते, याप्रकरणी ईडीकडून फेमा कायदा अंतर्गत भोसले यांच्याकडे चौकशी सुरु होती.

विदेशी चलन प्रकरणी फेमा कायदा अंतर्गत ईडीकडून चौकशी सुरु असलेले पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांच्या पुणे आणि नागपूर येथील संपत्तीवर ईडीने टाच आणली आहे. ईडीकडून भोसले याची ४० कोटी ३४ लाख रुपयाची संपत्ती सील करण्यात आली आहे.

भोसलेंची पत्नी, मुलगा आणि सून यांचीही झालेली चौकशी! 

अविनाश भोसले हे पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक आणि हॉटेल व्यवसायिक आहेत, मागील काही वर्षांपासून त्यांच्यामागे अंमलबजावणी संचलनालय (ईडी)चा ससेमिरा मागे लागला आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात ईडीने त्यांना समन्स बजावून चौकशीसाठी मुंबईतील कार्यालयात बोलावले होते. १० तास चौकशी करून त्यांना सोडून देण्यात आले होते. दरम्यान फेब्रवारी महिन्यात अविनाश भोसले, पत्नी, मुलगा आणि सून यांनादेखील ईडीने चौकशीसाठी बोलावले होते.

(हेही वाचा : ठाणे महापालिकेतील कंत्राटदाराला महापालिकेने दिले भरभरुन)

आयबीच्या परवानगीशिवाय ५०० कोटी जमा केले!

अविनाश भोसले यांच्या विदेशी बँकामध्ये आयबीच्या परवानगीशिवाय ५०० कोटी रुपये जमा करण्यात आले होते, याप्रकरणी ईडीकडून फेमा कायदा अंतर्गत भोसले यांच्याकडे चौकशी सुरु होती. सोमवारी अखेर ईडीने भोसले याच्या नागपूर आणि पुण्यातील ४० कोटी ३४ लाख रुपयांची संपत्ती सील केली असल्याची माहिती ईडीने दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here