‘त्या’ इमारतीचे सहा वर्षांपूर्वी वीज आणि पाण्याचे कनेक्शन तोडलेले, तरीही आठ ते दहा हजारांमध्ये मजुरांनी घेतले मरण ओढवून

146

कुर्ला पूर्व परिसरातील नाईक नगर सोसायटीतील इमारत दुघर्टनेत १९ व्यक्तींचा मृत्य झाला असून ०८ जण जखमी झाले आहे. परंतु ही इमारत धोकादायक असल्याने सन २०१४ आणि २०१५मध्ये या इमारती खाली करण्याच्या नोटीस महापालिकेने दिल्यानंतर सन २०१६मध्ये या इमारतींचे वीज व पाण्याचे कनेक्शन तोडण्यात आले होते. परंतु त्यानंतर सहा वर्षे या इमारतींमध्ये सहा ते दहा हजार रुपये भाडे घेऊन भाडेकरुंना ठेवले जात होते. बांधकामांचे कामगारांना या जागा भाड्याने दिल्या जात होत्या आणि या धोकादायक इमारतीत निवारा शोधत एकप्रकारे मृत्यूलाच निमंत्रण दिल्याची माहिती समोर येत आहे.

( हेही वाचा : MSRTC : एसटीचे स्मार्ट कार्ड काढण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ )

दुर्दैवी मृत्यू

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एल विभाग’ कार्यक्षेत्रातील कुर्ला परिसरात असणारी ‘नाईक नगर सहकारी संस्था’ची इमारत’ कोसळल्याची दुर्देवी घटना सोमवारी २७ जून २०२२ रोजी रात्री उशीरा घडली. या घटनेमध्ये १९ व्यक्तिंचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ०८ व्यक्ती जखमी झाल्या आहेत. जखमी व्यक्तिंपैकी ९ व्यक्तींवर आवश्यक ते उपचार केल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

नाईक नगरमध्ये सोसायटीत ए, बी, सी व डी अशा ४ ‘विंग’ असून यापैकी पहिल्या तीन ‘विंग’ या ५ मजली (४ अधिक तळ मजला) आहेत. तर ‘डी’ विंग ही ४ मजली (३ + तळ मजला) आहे. इमारत ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जमिनीवर सन १९७३ मध्ये बांधण्यात आली होती. सन २०१३ मध्ये २८ जून रोजी मुंबई महानगरपालिका अधिनियमातील कलम ३५४ नुसार सदर इमारतीला मोठ्या दुरुस्ती कामांची (Major Repairs) करण्याची नोटीस बजावण्यात आली होती.

परंतु या इमारतीमध्ये अपेक्षित दुरुस्ती कामे सदस्यांद्वारे करण्यात आली नाहीत. परिणामी या इमारतीवर कलम ‘४७५ ए’ नुसार कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात आली.

इमारत पाडण्याची नोटीस

इमारतीची दुरुस्ती न करण्यात आल्याने या इमारतीच्या ‘सी १’ या या प्रवर्गात सामावेश करून धोकादायक ठरवण्यात आली होती. त्यानुसार. १८ नोव्हेंबर २०१४ आणि २६ मे २०१५ रोजी ‘नाईक नगर सोसायटी’ इमारत पाडण्याची नोटीस देण्यात आली. आणि त्यानंतर १६ मे २०१६ रोजी इमारतीची जल व विद्युत जोडणी तोडण्यात आली होती आल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे. सचदेव आणि असोसिएट्स यांच्याद्वारे करण्यात आलेल्या ‘स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट’नुसार दि. ३० जून २०१६ नुसार सदर इमारत ‘सी २ बी’ या प्रवर्गात समाविष्ट करण्यात आली. इमारतीची त्यानंतर जल विद्युत जोडणी पूर्ववत करण्यात आली होती.

या चारही इमारती अतिधोकादायक असल्याने अखेर रहिवाशी सोडून गेले, परंतु ही रिकामी घरे मजुरांना पाच, सहा आणि दहा हजारांच्या भाड्याने दिली गेली होती आणि त्याठिकाणी मजुरांची कुटुंबे राहत होती. या रहिवाशांना याठिकाणी बाहेर काढण्यासाठी वारंवार सूचना करूनही ही कुटुंबे निघत नव्हती. महापालिकेने वीज व पाण्याची जोडणी तोडूनही ही लोक तिथे राहत होती,अशी माहिती स्थानिक माजी नगरसेविका प्रविणा मोरजकर यांनी दिली आहे. या इमारतीत मजूर राहतात हे माहित होते, परंतु एवढ्या मोठ्याप्रमाणात राहतात हे या दुघर्टनेनंतर लक्षात आल्याचेही त्यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.