Building Collapses In Surat: सूरतमध्ये सहा मजली इमारत कोसळून ७ जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरु!

92
Building Collapses In Surat: सूरतमध्ये सहा मजली इमारत कोसळून ७ जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरु!
Building Collapses In Surat: सूरतमध्ये सहा मजली इमारत कोसळून ७ जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरु!

सूरतमध्ये सहा मजली इमारत कोसळून (Building Collapses In Surat) सात जणांचा मृत्यू झाला आहे. या ठिकाणी ढिगारा उपसण्याचं काम सुरु आहे. काही लोक अडकले असण्याची भीती या ठिकाणी व्यक्त करण्यात येते आहे. गुजरातच्या सूरतमध्ये ही घटना घडली आहे. या ठिकाणी मदत आणि बचावाकार्य सुरु आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफ या दोन्हीची पथकं या ठिकाणी कार्यरत आहेत. (Building Collapses In Surat)

घटनेची माहिती मिळताच सूरत महापालिकेचे महापौर दक्षेज मावानी, उपमहापौर नरेंद्र पाटील, भाजपा आमदार संदीप देसाई आणि विरोधी पक्षाच्या नेत्या पायल साकरिया यांच्यासह इतर नेत्यांनीही घटनास्थळाला भेट दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरतमधल्या साचिन भागात सहा मजली इमारत कोसळली. या घटनेत सात जणांचा मृत्यू झाला. मदत आणि बचावकार्य सुरु असून ढिगाऱ्याखाली लोक अडकले असण्याची भीती आहे. आत्तापर्यंत तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. (Building Collapses In Surat)

आवाज आला अन्…

स्थानिक नागरिकांनी सांगितले की, बिल्डींग २०१७ मध्ये बांधण्यात आली होती. केवळ सहा वर्षांत २०२४ मध्ये ती पडली. त्यानंतर त्यामध्ये १० ते १५ कुटुंब राहत होते. शनिवारी, अचानक मोठा आवाज आला आणि बिल्डींग पत्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. परिसरात सर्वत्र धुळीचे कण तयार झाले. नागरिकांची पळपळ सुरु झाली. संपूर्ण बिल्डींग पूर्णपणे क्षतीग्रस्त झाली. घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरु झाले. एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीम पोहचली. (Building Collapses In Surat)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.