Mumbai Police : मुंबईतील पोलीस ठाण्यांमध्ये पायाभूत सुविधा उभारण्यावर भर; परिमंडळ ७ झाले आयएसओ प्रमाणित

121
पूर्व उपनगरातील परिमंडळ ७ पोलीस उपायुक्त कार्यालयसह संपूर्ण परिमंडळातील ८ पोलीस ठाण्यांना ‘इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन’ (ISO)ने प्रमाणित करण्यात आले आहे. (Mumbai Police) मुंबईतील १३ परिमंडळापैकी असलेल्या परिमंडळ ७ आणि त्यातील आठही पोलीस ठाण्यांकडून चांगल्या पायाभूत सुविधा, सुधारित सेवा आणि ‘आयएसओ’ ने ठरवलेल्या मानकांची पूर्तता करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त कार्यालय तसेच त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या आठही पोलिस ठाण्यांना ‘आयएसओ’चा दर्जा प्राप्त झाला आहे.
मुंबई पोलीस दलाची ख्याती देशातच नाही तर संपूर्ण जगात पसरलेली आहे, असताना परिमंडळ ७ आणि पोलीस ठाण्यांना मिळालेला ‘आयएसओ दर्जा’मुळे मुंबई पोलिस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. मुंबईसह उपनगरात मुंबई पोलीस विभागाचे १३ परिमंडळे आहेत, प्रत्येक परिमंडळात पोलीस उपायुक्त दर्जाचे अधिकारी आहेत.प्रत्येकी परिमंडळात ८ ते ९ पोलिस ठाणे येतात,दक्षिण मुंबईत १ ते ३ परिमंडळ, मध्य मुंबईत ४ते५ परिमंडळ पूर्व उपनगरात ६ आणि ७,पश्चिम उनगरात ८ ते १० आणि उत्तर उपनगरात ११आणि १२हे परिमंडळ येतात आणि पोर्ट झोन हा तेरावे परिमंडळ आहे.
परिमंडळ ७ मध्ये येणारे मुलुंड, भांडुप, नवघर, कांजूरमार्ग, विक्रोळी, पार्कसाईड, घाटकोपर आणि पंतनगर पोलीस ठाणी आणि पोलीस उपायुक्त कार्यालय परिमंडळ ७ (Deputy Commissioner of Police Office Zone 7) यांना आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त झाले आहे. मुंबईतील इतर पोलीस ठाणे आणि पोलीस उपायुक्त कार्यालयाकडून आयएसओ दर्जा मिळविण्यासाठी निकषांची पूर्तता केली जात आहे.
परिमंडळ सात मधील सर्वच्या सर्व आठ पोलीस ठाण्यांना तसेच पोलीस उपायुक्त कार्यालयाला देखील आयएसओ चा दर्जा प्राप्त झाला आहे. या निकषांची पूर्तता करण्यासाठी सर्व पोलीस ठाण्याची डागडुजी करण्यात आली आहे यासोबतच पोलीस ठाण्याच्या दर्शनी भागात हेल्प डेस्क ची निर्मिती करण्यात आली आहे सोबतच गुन्हे प्रकटीकरण आणि तक्रार निवारण हे अधिक जलद गतीने करण्याचा प्रयत्न या मुळे केला जाणार आहे. आय एस ओ दर्जाचं मानांकन मिळाल्यामुळे आता पोलिसांची कार्यक्षमता अधिक वाढेल असा विश्वास परिमंडळ सात चे पोलीस उपायुक्त विजयकांत सागर व्यक्त केला. (Mumbai Police)
हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.