गोराईतील त्या प्रकल्पबाधितांच्या इमारतींची होणार डागडुजी

153

प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी महापालिकेला प्राप्त झालेल्या बोरीवलीतील इमारतींची दुरुस्ती आता महापालिकेच्या माध्यमातून केली जाणार आहे. माहुलमधील प्रकल्पबाधितांच्या सदनिकांमध्ये राहण्यास नकार दिलेल्या भाडेकरूंची न्यायालयाच्या निर्देशानुसार या इमारतींमधील सदनिकांमध्ये पुनर्वसन केले होते. या इमारती फेब्रुवारी २०२२मध्ये महापालिकेने ताब्यात घेतल्यानंतर या इमारतींची डागडुजी केली होती, परंतु आता पुन्हा एकदा या इमारतींची डागडुजीसाठी रंगरंगोटी करण्यात येणार असून यासाठी सुमारे साडेचार कोटी रुपयांचा खर्च केले जाणार आहेत.

( हेही वाचा : India China Faceoff: अरुणाचल प्रदेशच्या तवांगमध्ये भारत-चीन सैनिकांमध्ये चकमक)

बोरीवली पश्चिम येथील गोराई येथे म्हाडाच्या माध्यमातून प्रकल्पबाधितांसाठी ५ ए, ५बी, ५सी आणि ५डी अशाप्रकारे तळ मजला अधिका सात मजल्यांच्या चार इमारती बांधण्यात आल्या होत्या. म्हाडाने बांधलेल्या या चार इमारती कोविडपूर्वी म्हणजे फेब्रुवारी २०२०मध्ये महापालिकेला हस्तांतरीत केल्या होत्या. या इमारती ताब्यात आल्यानंतर या इमारतींमध्ये माहुलमध्ये राहणाऱ्या प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन केले होते. माहुल एव्हरस्माईल पीएपी कॉम्प्लेक्समध्ये यापूर्वी पुनर्वसन केलेल्या प्रकल्पबाधितांनी येथील वातावरणाबाबत न्यायालयात धाव घेऊन या इमारती राहण्यास योग्य नसल्याचे सांगितले. त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पबाधितांचा विजय झाल्यानंतर या बाधितांचे पुनर्वसन बोरीवली पश्चिम येथील गोराई रोडवर म्हाडाने बांधलेल्या चार इमारतींमध्ये करण्यात आले. या इमारती ताब्यात घेण्यात आल्यानंतर प्रथम या इमारतींची डागडुजी करण्यात आली होती. परंतु त्यानंतरही रहिवाशांकडून इमारतीतील काही समस्या तसेच सदनिकांमधील काही कामांसंदर्भात महापालिकेकडे तक्रारी आल्याने येथील कामांची पाहणी करून सिव्हिल आणि विद्युत कामे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यामध्ये मायक्रो काँक्रिटींग, गच्ची,शौचालय,स्थानगृह, गच्चीवरील पाण्याची टाकी, आतून व बाहेरुन गिलावा, दारे व खिडक्या बसवणे, इमारतीची अंतर्गत व बाहेरुन रंगकाम, नळकामे शिवाय घरांच्या आतील पॉईंट वायरींग बदलणे, इमारतीच्या पॅसेज,जिना, पंप रुम, उद्वाहन रुम, मीटर रुम व परिरसरातील दिवे बदलणे, आवश्यकतेनुसार दिवे व पंखे काढून पुन्हा बसवणे आदी कामे केली जाणार असल्याची माहिती इमारत परिरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे. या कामांसाठी सुमारे अडीच कोटी रुपये खर्च केले जाणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.