सावधान! सोशल मीडियामधून आक्षेपार्ह पोस्ट शेअर करताय? हे वाचा…

198

सामाजिक व जातीय सलोखा कायम राहण्यासाठी सोशल मीडियामधून प्रसारित होणा-या आक्षेपार्ह व जनप्रक्षोभक पोस्ट तसेच सोशल मीडियामधून कोणत्याही धर्माच्या भावना दुखावतील व जातीवाचक तेढ निर्माण होऊ नये, तसेच जातीय भावना भडकवणारे आक्षेपार्ह संदेश प्रसारित होऊ नये, याकरिता सोशल मीडिया प्रतिबंधीत करण्यासाठी भारतीय दंड संहितेचे कलम 505,153 (A) व 116 अन्वये संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यामध्ये समाज माध्यमांवरून आक्षेपार्ह पोस्ट प्रसारीत करण्यास प्रतिबंध करण्याचे आदेश जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी दिले आहे.

अन्यथा कारवाई होणार

आदेशानुसार कोणत्याही प्रकारे धर्म, भाषा, जात किंवा जनसमाज यांच्या किंवा अन्य कोणत्याही कारणावरून निरनिराळे धार्मिक, वंशिक, भाषिक किंवा प्रादेशिक गट अगर जाती जनसमाज यांच्यामध्ये तेढ अथवा शत्रुत्वाच्या, द्वेष भावना निर्माण होईल अशा आक्षेपार्ह पोस्ट किंवा अफवा, अनधिकृत माहिती समाज माध्यमाच्या माध्यमातून पसरवणारे व्यक्ती अथवा संस्था अथवा संघटना या कायद्यान्वये कायदेशीर व दंडनीय कारवाईस पात्र राहील.

भयग्रस्त वातावरण निर्माण करु नका

निरनिराळे धार्मिक, आषिक किंवा प्रादेशिक गट जाती  जनसमाज यांच्यामध्ये एकोपा टिकण्यास बाधक अशी आणि ज्यामुळे सार्वजनिक शांतता बिघडते किंवा बिघडवणे संभाव्य असते, अशा पोस्ट सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवणारे व्यक्ती अथवा संस्था अथवा संघटना या कायद्यान्वये कायदेशीर व दंडनीय कारवाईस पात्र राहील. एखादी व्यक्ती सार्वजनिक उपद्रव अपराध करण्यास प्रवृत होईल, अशा प्रकारे जनतेमध्ये अथवा जनतेपैकी एखाद्या भागामध्ये भीती किंवा भयग्रस्त वातावरण निर्माण होईल, त्यामुळे तसे होण्याची शक्यता असेल किंवा एखाद्या समुहातील व्यक्तीला दुस-या कोणत्याही वर्गाविरुद्ध किंवा समूहाविरुध्द कोणताही अपराध करण्यास चिथावणी देण्याचा उद्देश असेल, चिथावणी दिली जाण्याची शक्यता असेल, अशा पोस्ट सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवणारे व्यक्ती अथवा संस्था अथवा संघटना या कायद्यान्वये कायदेशीर व दंडनीय कारवाईस पात्र राहील.

( हेही वाचा: जेवढं भुंकायचं असेल तेवढं भुंका! थेट उत्तर देणार! काय म्हणाले संजय राऊत? )

प्रक्षोभक पोस्ट प्रसारित करु नका

सोशल मीडियावर जी  व्यक्ती, संस्था, संघटना अॅडमिन म्हणून कार्यरत असेल, त्यांनी त्यांच्या ग्रूपवर कोणत्याही प्रकारच्या प्रक्षोभक पोस्ट प्रसारित होणार नाहीत याबाबत काळजी घ्यावी. अन्यथा सदर अॅडमिन नियमानुसार, कारवाईस पात्र राहील. त्याचप्रमाणे या आदेशाद्वारे विहीत करण्यात आलेल्या कोणत्याही निर्बंधाची किंवा काढलेल्या आदेशाची अवज्ञा करणा-या कोणत्याही व्यक्तीने, भारतीय दंड संहिता कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला आहे, असे मानण्यात येईल. सदर आदेश बुलडाणा जिल्हयातील शहरी तसेच ग्रामीण भागातही पुढील आदेशांपर्यंत लागू करण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.