सध्या रस्ते अपघाताच्या घटनांमध्ये दिवसागणिक वाढ होतांना दिसून येत आहे. अशातच (Buldhana ST Bus Accident) मलकापूर- बुलढाणा बसच्या भीषण अपघाताची माहिती मिळाली आहे.
मलकापूर- बुलढाणा (Buldhana ST Bus Accident) या बसचा ब्रेक फेल झाल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि ही बस थेट राजूर घाटात पलटी झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बसमधून एकूण ५५ प्रवासी प्रवास करत होते. या प्रवाशांमध्ये काही विद्यार्थ्यांचा देखील समावेश होता. या अपघातात १० ते १५ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
(हेही वाचा – बद्रीनाथ महामार्ग वाहून गेल्याने तब्बल एक हजार भाविक अडकले)
मलकापूर- बुलढाणा बसच्या भीषण अपघाताची (Buldhana ST Bus Accident) माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना सध्या बाहेर काढण्यात येत आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. बस चालकाच्या समयसूचकतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे.
मलकापूर-बुलढाणा बस राजूर घाटात आल्यानंतर बसचे ब्रेक फेल झाले. बसचे ब्रेक फेल झाल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला.
मलकापूरहून बुलढाणाकडे (Buldhana ST Bus Accident) ही बस निघाली होती. यामध्ये १० प्रवाशांना किरकोळ मार लागला असून जखमींना जवळच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. आज म्हणजेच मंगळवार २५ जुलै रोजी सकाळी ९:४५ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community