Faheem Khan : नागपूर हिंसाचाराचा (Nagpur violence) मास्टरमाइंड फहीम खानच्या (Faheem Khan) घरावर बुलडोझर (Faheem Khan bulldozer action) चालवण्यात आला आहे. मागच्या आठवड्यात नागपूरच्या महाल भागात दोन गटात मोठा राडा झाला होता. या हिंसक संघर्षात मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. वाहनं फोडण्यात आली. वाहनांना आगी लावण्यात आल्या. हिंसक झालेल्या जमावाने दगडफेक केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करणारे पोलीस आणि आग विझवण्यासाठी पोहोचलेले अग्निशमन दलाचे जवान यामध्ये जखमी झाले. या हिंसाचारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तसेच या घटनेत एकूण ११२ आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्यावरुन हा सर्व वाद झाला. काही अफवा पसरवण्यात आल्या. या सगळ्या हिंसाचारामागचा मास्टरमाइंड फहीम खानच्या घरावर बुलडोझर चालविण्यात येत आहे. (Faheem Khan)
(हेही वाचा – वादग्रस्त samay raina ला कोण नाही ओळखत; तो किती पैसे कमावतो?)
उत्तर प्रदेशप्रमाणेच नागपुरातही गुन्हेगारांविरोधात कठोर पावले उचलण्याच्या दृष्टीने ही कारवाई होत असल्याची चर्चा आहे. नागपूर महानगरपालिकेच्या पथकाकडून फहीम खानच्या घरावर तोडकामाची कारवाई प्रत्यक्ष सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, तोडकामापूर्वी फहीम खानच्या कुटुंबियांना नोटीस देण्यात आली होती. त्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी रात्रीच घर रिकामे केले होते. हे घर फहीम खानच्या आईच्या नावावर होते. यासोबतच EWS योजनेअंतर्गत NITने खान कुटुंबाला ही जागा 30 वर्षांच्या लीजवर दिली होती. कारवाईपूर्वी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखावी, यासाठी यशोधरानगर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यात स्थानिक पोलिसांसह एसआरपीएफच्या दोन तुकड्यांचा समावेश आहे.
(हेही वाचा – Vidyavihar Fire Case: विद्याविहारमध्ये हाऊसिंग सोसायटीला आग, एकाचा मृत्यू)
दरम्यान दोन दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही (CM Devendra Fadnavis) बुलडोझर कारवाईचा इशारा दिला होता. ‘हिंसाचारात सहभागी असलेल्यांना धडा शिकवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. विशेषतः ज्यांनी पोलिसांवर हल्ला केला आहे त्यांना आम्ही सोडणार नाही. हिंसाचारामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई दंगलखोरांना करावी लागेल. त्याची मालमत्ताही जप्त केली जाईल. जिथे बुलडोझर चालवण्याची गरज असेल तिथे बुलडोझर चालवला जाईल. कोणालाही सोडले जाणार नाही.’ असा इशारा फडणवीसांनी दिला होता.
कोण आहे फहीम खान?
फहीम खान हा मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी (एमडीपी) शहराध्यक्ष आहे. इयत्ता दहावीपर्यंत फहीम खान याचं शिक्षण झालय. सध्या तो 38 वर्षांचा आहे. मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी (एमडीपी) शहराध्यक्ष असलेल्या फहीम खान याने लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्याला 1 हजार 73 मतं मिळाली होती. फहीम खानने नागपुरात जमाव जमवल्याचा आरोप केला जात आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community