ठाणे खाडीतून जाणार बुलेट ट्रेन; पर्यावरणाचा -हास होणार का, वाचा अहवालात काय?

144

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी झाडांच्या तसेच खारफुटींच्या कत्तली होत असताना या बुलेट ट्रेनला पालघर तसेच भिवंडीतून जोरदार विरोध होऊ लागला आहे. या बुलेट ट्रेनचा काही अंतराचा मार्ग ठाणे खाडीतील ३० मीटर खाली जमिनीतून जात आहे. जमिनीखालून ३० मीटर आत ट्रेन जात असल्याने पर्यावरण -हास होत नसल्याचा निर्वाळा या संस्थेने दिला आहे.

या प्रकल्पासाठी ठाणे, मुंबई तसेच पालघर येथील २२ हजार ९९७ खारफुटी तोडल्या जाणार आहेत. खारफुटी तोडल्याप्रकरणी नुकसान भरपाई म्हणून मुंबई उच्च न्यायालयाने राष्ट्रीय हायस्पीड रेल कॉर्पोरेशनला अडीच लाख रोपांची लागवड करण्याचे निर्देश दिले आहेत. वसई-विरार येथील तब्बल १ हजार ३६८ झाडांचीही कत्तल केली जाणार आहे. या झाडांना वाचवण्यासाठी पाच हजारांहून अनेकांनी वसई-विरार महानगरपालिकेला आपल्या हरकती नोंदवल्या आहेत. या दोन घटनांनंतर बुधवारी वनविभागाच्या कांदळवन कक्षाने ठाणे खाडीतून ३० मीटर खाली बोगद्यातून जाणा-या बुलेट ट्रेनबाबत माहिती दिली. बोगद्यामुळे खाडी तसेच दलदलीच्या भागावर होणारा परिणाम अभ्यासण्याकरता केंद्रीय खनन आणि इंधन अनुसंधान संस्थान यांनी अभ्यास केला. बोगदा ३० मीटर खालून जाणार असल्याने दलदल तसेच खाडीवर याचा काहीच परिणाम होणार नाही, असा दावा अभ्यासकांनी केला. बोगद्याच्या निर्मिती प्रक्रियेत पर्यावरणीय हानी कमी असली तरीही बुलेट ट्रेनमुळे होणारी हानी न भरुन निघणारी असल्याचा आरोपही पर्यावरणतज्ज्ञांनी केला.

( हेही वाचा: January 2023: नवीन वर्षात कोणते नियम बदलणार ? जाणून घ्या सविस्तर )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.