मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) बरहानपूर जिल्ह्यातील बाबा नवनाथांच्या (Baba Navnath) समाधीला कट्टरपंथींनी दर्गा असल्याचा दावा केला होता. त्यानंतर दोन्ही समाजाची बैठक बोलावण्यात आली होती. मात्र कट्टरपंथींनी व्यासपीठावर धार्मिक तेढ निर्माण करत गोंधळ घातला. यावेळी व्यासपीठावर कट्टरपंथींनी लाठीहल्ला केला. त्यावेळी पोलिसांनी प्रकरण शांत करण्यासाठी मध्यस्थी केली. हे प्रकरण दि. १८ नोव्हेंबर रोजी घडली. (Baba Navnath)
( हेही वाचा : Assembly Election : आचारसंहिता भंगाच्या १०१३४ तक्रारी निकाली; ७०६ कोटी ९८ लाख रुपयांची मालमत्ता जप्त)
पोलीस दोन्ही पक्षांना शांतता राखण्याचे आवाहन करत होते. मात्र तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे बैठक अपूर्णच राहिली. पण प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर दोन्ही पक्ष एकमेकांना भिडले. त्याचवेळी हिंदू (Hindu) पक्षाने कट्टरपंथींयांनी दगडफेक करण्याचा आरोप केला आहे. तसेच घटनास्थळी अतिरिक्त फौजफाटा मागवण्यात आला असून त्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. या वादात दोन्ही समूहाचे एकूण ४ जण जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Baba Navnath)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community