नागपूर-भोपाळ महामार्गावरील बरेठा घाटाजवळ आज (२० एप्रिल) सकाळी होमगार्ड आणि पोलिस कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात (Bus Accident) झाला. या अपघातात २१ जण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पहाटे चारच्या सुमारास ट्रकला ओव्हरटेक केल्याने हा अपघात (Bus Accident) झाला आहे. छिंदवाडा येथून ड्युटी संपवून सैनिकांनी भरलेली बस बरेठा घाटावर आली तेव्हा ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या बसला धडकली. (Bus Accident) धडकेनंतर बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पलटी झाली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस ताफा घटनास्थळी पोहोचला आणि जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. (Bus Accident)
(हेही वाचा –Lok sabha Election 2024: नक्षलग्रस्त गडचिरोलीत सर्वाधिक टक्के मतदान, तर सर्वात कमी टक्के मतदान कुठे?)
छिंदवाडाहून राजगढला जाणाऱ्या या बसमध्ये ४० जण होते, ज्यात ३४ होमगार्ड शिपाई आणि ६ पोलीस होते. अपघातात २१ जण जखमी झाले असून १२ किरकोळ जखमींना आरोग्य केंद्र शाहपूर येथे दाखल करण्यात आले आहे. ९ गंभीर जखमींना जिल्हा रुग्णालयात बैतुल येथे दाखल करण्यात आले आहे. बसमध्ये प्रवास करणारे अशोक कुमार कौरव यांनी सांगितले की, “आम्ही निवडणूक ड्युटी करून परतत होतो, आमच्यासोबत ३४ होमगार्ड आणि ६ पोलीस बसमध्ये प्रवास करत होते. वाटेत चहा पिऊन आम्ही राजगडच्या दिशेने निघालो, तेव्हा बरेठा घाटात ट्रकला धडकल्यानंतर बस खड्ड्यात पलटी झाली.” (Bus Accident)
(हेही वाचा –Odisha Accident: ओडिशातील झारसुगुडा येथे भीषण दुर्घटना; महानदीत बोट उलटल्याने महिलेचा मृत्यू, ७ जण बेपत्ता)
एसडीओपी बैतुल शालिनी परस्ते यांनी सांगितले की, हा अपघात शाहपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाला. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताचा अधिक तपास करण्यात येत आहे. (Bus Accident)
हे पहा –
Join Our WhatsApp Community