Bus Accident: लग्नासाठी निघालेली बस ताम्हिणी घाटात उलटली; ५ जणांचा मृत्यू, २५ जखमी

279

ताम्हिणी घाटाजवळ (Tamhini Ghat) एका धोकादायक वळणावर बसचा भीषण अपघात (Accident News) झाला आहे. बस दरीत कोसळून पाच जण ठार झाल्याची माहिती मिळत आहे. तर, २३ ते २५ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. चाकण (Chakan) इथून महाडला (Mahad) येथिल बिरवाडी येथे लग्नासाठी जात असताना २० डिसेंबरला पहाटेच्या सुमारास अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. बसमध्ये ४० च्या आसपास प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. (Bus Accident)

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पुण्याहून बिरवाडीकडे लग्नासाठी निघालेली खासगी बस (एमएच १४ जीयू ३४०५) पुण्याहून माणगांवकडे येत होती. बस ताम्हिणी घाटात अवघड वळणावर आल्यानंतर रस्त्याच्या बाजूला पलटी झाली. हा अपघात इतका भीषण होता की, बसमधील 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. २५ पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच माणगाव पोलीस (Mangaon Police) तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे नेण्यात आले.

(हेही वाचा – कल्याणच्या घटनेवर Raj Thackeray संतापले, ‘एक्स’वर पोस्ट करत म्हणाले, महाराष्ट्र सैनिकांनी हल्ला…)

मयतांची नावे

मृतांमध्ये ३ महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. संगिता धनंजय जाधव, गौरव अशोक दराडे, शिल्पा प्रदीप पवार, वंदना जाधव अशी मृतांची नावे असून, एका मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.