मध्य प्रदेशातील गुनामध्ये बुधवारी (२७ डिसेंबर) रात्री बस आणि डंपरचा भीषण अपघात झाला.बजरंगगड पोलीस स्टेशन परिसरातील गुनाहून आरोनला जाणाऱ्या प्रवासी बसला दोहाई मंदिराजवळ डंपरची धडक बसल्याने आग लागली. अनेक प्रवाशांनी बसमधून उडी मारून आपला जीव वाचवला. आतापर्यंत बसमधून 12 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. सुमारे 15 जण जखमी झाले असून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस आणि प्रशासकीय कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आहेत. (Accident)
हा अपघात रात्री 9 च्या सुमारास घडला. डंपर आणि बसमध्ये जोरदार धडक झाली. त्यानंतर बसमध्ये आग लागली. बसमधील 12 प्रवासी जिवंत जळाले. या प्रवाशांना रुग्णालयात नेताना आणि रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. काळजाचा थरकाप उडवणारा हा भीषण अपघात होता. 15 प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. बसमध्ये जवळपास 40 प्रवासी होते. पोलीस घटनास्थळी पोहोचले. आसपासच्या लोकांनी बचावकार्यात मदत केली. घटनास्थळी पोलीस असून फायर ब्रिगेडकडून बचावकार्य सुरु आहे. (Accident)
(हेही वाचा : Mumbai Police : मुंबईत नायलॉन मांजा विक्रेत्यांवर पोलिसांनी केल्या धडक कारवाया)
स्थानिकांनी सांगितले की, ट्रकला धडकून बस उलटली आणि तिला आग लागली.परंतु बसमध्ये अडकलेल्या लोकही आगीत भाजले. बजरंगगढ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोहाई मंदिराजवळ हा अपघात झाला. बसची स्थिती खूपच खराब होती. हे अपघाताचे प्रमुख कारण असल्याचे पुढे आले आहे. पण तरीही प्रवासी वाहतुकीसाठी वापर सुरु होता.मध्य प्रदेश सरकारने मृतांना ४ लाख आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.
हेही पहा –