रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमिवर इंडोनेशियाने पामतेल निर्यातीच्या बंदीनंतर भारतात पामतेलाच्या किमतीत वाढ झाली आणि या वाढीमुळे खाद्यपदार्थांचे भाव गगनाला भिडले आहेत. कच्च्या मालाच्या किमतीमुळे आता गुड डे बिस्किट या प्रसिद्ध ब्रॅंडने उत्पादनांच्या किमती वाढवण्याचा विचार सुरु केला आहे. यामुळे ब्रिटानियाची उत्पादने 10 टक्क्यांपर्यंत महाग होऊ शकतात.
महागाई सातत्याने वाढत असल्यामुळे कच्च्या मालाची किंमत वाढल्याने कंपनीकडे उत्पादनांच्या किमती वाढवण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही असे ब्रिटानिया कंपनीचे म्हणणे आहे.
( हेही वाचा :मी पळालेलो नाही, खोटे गुन्हे दाखल करू नका! काय म्हणाले संदीप देशपांडे? पहा व्हिडिओ )
महागाई अशीच वाढत राहिली तर…
मागच्या काही दिवसांत गहू, खाद्यतेल आणि साखरेच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे पॅकेज्ड फूड कंपन्यांना किमती आणखी वाढवाव्या लागल्या आहेत. भारत आणि युक्रेनमध्ये आयात- निर्यातीच्या संकटामुळे पुरवठा खंडित झाल्यामुळे देशभरात गव्हाच्या किमती वाढल्या आहेत. महागाई नियंत्रणात न आल्यास कंपनी उत्पादनांमध्ये 10 टक्क्यांची वाढ करु शकते. सध्या आम्ही दर महिन्याला परिस्थितीचा आढावा घेत असल्याचे, म्हटले आहे. ग्राहकांवर याचा बोजा पडू नये याचाही विचार केला जाणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community